Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिका आरोग्य विभागाने व्यवसाय परवाना साठी आरोग्य अधिकाऱ्याची सक्तीची भाषा

सांगली महापालिका आरोग्य विभागाने व्यवसाय परवाना साठी आरोग्य अधिकाऱ्याची सक्तीची भाषा



सध्या महापालिका आरोग्य विभाग,व्यवसाय परवाना घेण्यास व त्याचे भरमसाठ असे वाढीव वार्षिक शुल्क भरण्यास ,आरोग्य अधिकारी श्री आंबोळे सक्तीची भाषा वापरत आहेत,तसे न झाल्यास दुकानं सील करतो अश्या धमक्याही ते विविध दुकानांत अधिकाऱ्यांना पाठवून देत आहेत,

आमची दुकानं सील करण्याची भाषा वापरण्या आधी त्यांनी स्वतः ची पात्रता तपासून घ्यावी अन्यथा आम्ही ती सार्वजनिक करू,ती वेळ शहरातील व्यापरांवर त्यांनी शक्यतो आणू नये,

मुळात आरोग्यविभाग व्यवसाय परवाना हा ठराविक व्यवसायांसाठी आहे,त्यात सर्वच व्यापाऱ्यांना अनधिकृत पणे यांनी घुसडून लूट माजवली आहे, हे बेकायदेशीर आहे,अशी कोणतीही जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही,व या परवाण्याशी समंध नसणार कोणीही व्यापारी नोंदणी करणार नाही,

मा.आयुक्त आणि सत्ताधारी यांना आमचा थेट प्रश्न आहे, की मागील महापूर व लॉक डाऊन मध्ये तुम्ही कोणती मदत केली?

केली असेल तर उत्तर द्या,

नुसतं कारवाही करतो,जप्ती करतो ही भाषा सोडून दुसरं काय बोललात का तुम्ही?

आरोग्यधिकारी असली भाषा वापरून वृत्त देतात,याचा अर्थ सत्ताधारी आणि प्रशासनात व्यापाऱ्यांची किंमत शून्य आहे का?असं स्पष्ट समजावं का?

जर आमच्याशी थोडे जरी समंध चांगले असतील तर मा.आयुक्त आणि मा.महापौर व विरोधी बाकावरील मंडळी यांनी या  आरोग्य अधिकाऱ्यास जरा आवरा,अन्यथा याचे जे परिणाम होतील त्यास श्री आंबोळे जवाबदार असतील,

राज्यात कुठंही असला प्रकार नाही,इतकं शुल्क तर नाहीच,शिवाय मुंबई उच्च न्यायालयाचा अशी नोंदणी आणि वसुली करण्यास मनाई आदेश आहे,

आम्ही मा.एकनाथजी शिंदे,नगरविकास मंत्री यांची लवकरच भेट घेऊन हे सगळं कथन करणार आहोत,शिवाय मा.पालकमंत्री यांनाही निवेदन देणार आहोत,

आधीच सांगलीतील व्यापारी लॉक डाऊन आणि महापूर यामुळे देशोधडीला लागला आहे,हे प्रशासन जाणते,तरीही दुकानं सील करण्याची खेदजनक व लाजिरवाणी भाषा हे लोक वापरत आहेत,याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत,

आम्ही व्यवसायिक घरपट्टी,पाणी पट्टी व इतर माध्यमातून स्थानिक पातळीवर नोंद आहोत,शिवाय जी एस टी, आयकर,सेवाकर या माध्यमातून सुद्धा नोंद आहोत,व कर सुद्धा भरत आहोत, मग ही नवीन नोंदणी का?

कर भरावा आणि मग जगावं अशी आमची व्याख्या आमच्या महापालिकेने आणि सत्ताधार्यांनी केली आहे

आता असं म्हणणं वावगं नाही,,

आमचं याच माध्यमातून महापालिका सत्ताधारी, प्रशासन,मा.पालकमंत्री, मा.आमदार ,मा.खासदार व विविध सर्व लोकप्रतिनिधी, यांना विनंती आहे,सदर चाललेलं कारवाही सत्र व धमक्या या थांवाव्यात,आमची आत्ता कुठं लाइन परत बसत आहे, अश्या आमच्या अडचणीच्या काळात आमचा छळ करू नये,की जो आमच्या लक्ष्यात राहील,

तुम्हाला नोंदणी करायची आहे ना,जरूर करा,परवाने विनाशुल्क प्रत्येक दुकानांत पोहोच करा,आमची हरकत नाही,

जर प्रशासन सकारात्मक पाऊल उचलत नसेल तर मात्र व्यापारी मेळावा घेऊन,आंदोलनाची दिशा निश्चित करावी लागेल,

धन्यवाद,

दि:-29/03/2022

व्यापारी एकता असोसिएशन


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.