Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या भावाचा जडला नववधूवर जीव, पुढची कहाणी खूपच रंजक

 लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या भावाचा जडला नववधूवर जीव, पुढची कहाणी खूपच रंजक


मुंबई : लग्नासंबंधीत अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत, ज्या ऐकून आपल्याला कधी हसू येतं तर कधी डोळ्यात पाणी. लग्न ही प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे.

कारण त्यानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतु आज आम्ही तुम्हाला लग्नाशी संबंधीत एक अशी बातमी सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण आपल्याच भावाच्या लग्नामध्ये त्याच्या बायकोच्या प्रेमात दीर पडला आणि त्यानंतर जे घडलं, त्याचा कोणीही विचार देखील केला नसावा. वास्तविक, या घटनेबद्दल त्या व्यक्तीने स्वतः सांगितले आहे.

सोशल मीडियावर जो नावाच्या व्यक्तीने सांगितले की, ही खूप जुनी कथा आहे आणि ही एक वेदनादायक कथा आहे. त्याने सांगितले की, त्याच्या मोठ्या भावाचे लग्न होते आणि त्या दरम्यान तो आपल्या भावाच्या वधूच्या प्रेमात पडला होता. परंतु त्याने याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते.

अहवालानुसार, वराच्या मोठ्या भावाचा काही दिवसातच दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर त्याचे कुटुंब पूर्णपणे तुटले आणि नंतर त्या व्यक्तीने आपल्या भावाच्या बायकोशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला अनेक दशके उलटून गेली आहेत. नुकतेच सोशल मीडियावर 'त्या' व्यक्तीला कोणीतरी विचारले की, तू तुझ्या वहिनीशी लग्न का केलेस? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या व्यक्तीने संपूर्ण कहाणी सोशल मीडीयावर सांगितली.

लग्नाच्या मंडपातच आपल्या वहिनीच्या प्रेमात पडल्याचे त्याने सांगितले, मात्र आपण कोणालाच सांगू शकलो नाही. त्यानंतर भावाच्या मृत्यूनंतर दोघांनी लग्न केले. 'या' व्यक्तीच्या प्रेमाची ही अजब-गजब गोष्ट सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. ज्याची सगळेजण चर्चा करत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.