"डॉक्टर नालायक हरामखोर आहेत, ते मारखाण्याच्या लायकीचे आहेत"
अमरावती: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल अपशब्द वापरत थळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल अपशब्द वापरत राग व्यक्त केला आहे. डॉक्टर मारखाण्याच्या लायकीचे आहेच, असं खळबळजनक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
जेवढा शिकलेला माणूस तेवढा गाढव आहे. डॉक्टर लोक हे नालायक आहेत, ते लुटारू आहेत. ते हरामखोर आहेत, ते मारायच्या लायकीचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. तर डॉक्टर रूग्णांना लुटतात, त्यांच्याकडे कधी जाऊ नका. हे डॉक्टर मारखाण्याच्या लायकीचे आहेत, असंही संभाजी भिडे म्हणाले.
दरम्यान, भिडे यांनी कार्यक्रमात मास्क घालून बसणाऱ्यालाही मास्क काढायला सांगितला. तू मराठी माणूस आहे XXडू नाही. कोरोना थोतांड आहे, डॉक्टर नालायक आहेत. कोरोना काळात या डॉक्टरांनी लोकांना लुटलं. डॉक्टरांकडे कधी जाऊ नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.