33 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती?
मुंबई : ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 33 वर्षे किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2020 पासून सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगितले जाणार असल्याचे मॅसेज, स्क्रीनशॉट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याआधी केंद्र सरकारच्या नावाने अशी बातमी व्हायरल केली जात होती. आता राज्य सरकारच्या नावाने अशी खोटी माहिती पसरली जात आहे. या खोट्या मॅसेजमुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी देखील असाच एक मॅसेज व्हायरल होत होता. ज्यामध्ये कार्मिक व प्रशिक्षण विभागाने हा सक्तीच्या निवृत्तीचा प्रस्ताव मंजूर केल्याचा उल्लेख या मॅसेजमध्ये होता. याबाबत केंद्र सरकारने खुलासा केला होता. असा कोणताही प्रस्ताव मंजूर केला नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.
'ज्या कर्मचाऱ्यांचे 33 वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे .अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती होण्याआधीच सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगितले जाईल. याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाने प्रस्ताव तयार केला आहे .व या प्रस्तावाला लवकरच मंजूर देण्यात येणार आहे.' अशी खोटी माहिती आता पसरवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.