महापालिकेचा व्यवसाय परवाना काढणेसाठी आज अखेरची मुदत : 1 एप्रिल पासून परवाना नसणाऱ्या व्यवसायावर कारवाई: आयुक्त नितीन कापडणीस
सांगली: महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय धारकाना महापालिकेचा व्यवसाय परवाना काढणेसाठी आज गुरूवार 31 मार्च 2022 ही अखेरची मुदत आहे. या मुदतीनंतर मनपाचा परवाना नसणाऱ्या व्यवसायावर शुक्रवारपासून कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत त्यांनी आपल्या व्यवसायाचा महापालिकेचा व्यवसाय परवाना काढून घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यानी केले आहे.
महापालिका क्षेत्रात अनेक व्यवसायांना महापालिकेचा व्यवसाय परवाना नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रात विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा विनापरवाना व्यवसाय धारकांसाठी सुलभपणे परवाना देता यावा यासाठी 28 मार्च ते 31 मार्च 2022या दरम्यान आरोग्य विभागाकडून विशेष व्यवसाय परवाना शिबिर घेणेत आले आहे. या शिबिरात अनेक व्यवसाय धारकांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र अजूनही महापालिका क्षेत्रातील व्यवसाय धारकांना महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणेची संधी आहे. 31 मार्च 2022 पर्यंत व्यवसाय धारकांनी आपल्या सुरू असणाऱ्या व्यवसायाचा महापालिकेचा व्यवसाय परवाना घ्यावा. 31 मार्च नंतर ज्या व्यवसायांना महापालिकेचा परवाना नाही अशा व्यवसायावर 1 एप्रिल पासून कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी महापालिकेचा व्यवसाय परवाना काढून घ्यावा असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.