13 वर्षांच्या मुलीवर 16 वर्षांच्या भावाचा बलात्कार
एका 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना राजस्थानच्या प्रतापगढ येथे घडली आहे. पीडिता 8 महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला.
पीडिता तिच्या आजीसह राहते.
तिची आजी घरकाम करत असून पीडितेचे आई वडील हे मंदसौर येथे मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी तिच्या पायाला भाजल्याने ती मंदसौर येथे शासकीय रुग्णालयात गेली. तिथे तिच्या शारीरिक अवस्थेविषयी शंका आल्याने डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली. तेव्हा ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचं उघडकीला आलं.
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रतापगढ येथे वर्ग केला. येथील पोलिसांनी याबाबत पीडितेच्या कुटुंबाला विचारणा केली तेव्हा त्यांना याविषयी काहीही कल्पना नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशात फिरून पीडितेशी संबंधित लोकांविषयी माहिती मिळवली.
काही संबंधितांवर संशय आल्याने पोलिसांनी काही जणांचे डीएनए नमुने चाचणीसाठी पाठवले. तेव्हा पीडितेच्याच एका भावाशी ते नमुने जुळले. तसंच पीडितेने आणखी एका भावाविरुद्ध साक्ष दिली. त्यामुळे त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा पीडितेवर दोन भावांनी मिळून वेगवेगळ्या वेळी अत्याचार केल्याचं कबूल केलं. यातील 16 वर्षांच्या भावामुळे ती गर्भवती झाली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून 16 वर्षीय मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.