Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

CM KCR यांनी हॉटेलमध्ये घेतली या अभिनेत्याची भेट, पवारांच्या घरीही उपस्थिती पाहून सर्वजण थक्क

 CM KCR यांनी हॉटेलमध्ये घेतली या अभिनेत्याची भेट, पवारांच्या घरीही उपस्थिती पाहून सर्वजण थक्क


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के चंद्रशेखर राव यांच्या भेटीची चर्चा आज राजकीय वर्तुळात आहे. पण य़ा सोबतच आता आणखी एका भेटीची चर्चा आहे. ती म्हणजे अभिनेते प्रकाश राज आणि के चंद्रशेखर राव. महत्त्वाचं म्हणजे के चंद्रशेखर राव हे जेव्हा शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा अभिनेते प्रकाश राज हे देखील तेथे उपस्थित होते. 


प्रकाश राज पूर्णवेळ राजकारणी बनण्याचा विचार करत आहेत का? अशी चर्चा आता सुरु झालीये. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिसले तेव्हा सर्वजण थक्क झाले.

के चंद्रशेखर राव यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ही भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब त्यांचं स्वागत केलं. प्रकाश राज यांनी 2019 मध्ये बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांनी गेल्या वर्षी एमएए अध्यक्षपदासाठी मंचू विष्णू यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मेगास्टार चिरंजीवीच्या टीमचा कथित पाठिंबा असूनही त्यांना पराभवाचा धक्का बसला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.