चंद्रकांत पाटलांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटीलांनी मोठा दावा केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी ईडीच्या कारवाया होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही मविआ नेत्यांची यादी जाहीर केली आहे.
अनेकांवर लवकरच कारवाई होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ज्या दिवशी 93 च्या बॉम्बस्फोटांनंतर नेमलेल्या समितीचा अहवाल बाहेर येईल, त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही. तसेच तुरुंगातही त्यांच्यासाठी जागा उरणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी पहाटे 5 वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर 7 वाजल्यापासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु होती. 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं मलिकांना अटक केली. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. ईडीने मलिकांना विशेष कोर्टासमोर हजर केलं आहे. तेव्हा कोर्टाने नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
दरम्यान,मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने गुरुवारी ठिकठिकाणी आंदोलने केली. यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये देखील भाजपने आंदोलन केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.