अभिनेत्रीकडून करवून घेत होते वेश्या व्यवसाय; तिघींची सुटका, दोन दलालांना अटक
पिंपरी : छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीकडून काही दलाल पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करून घेत होते. या अभिनेत्रीसह तीन महिलांची पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायातून सुटका केली. दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 23) ताथवडे येथील लॉजवर करण्यात आली.
जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (वय 48, रा. वाघोली), हेमंत प्रणाबंधू साहू (वय 32, रा. पुणे-नगर रोड, वाघोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जितेंद्र आणि हेमंत हे दोघेजण त्यांचे साथीदार मुकेश, करण आणि युसूफ यांच्या सांगण्यावरून मोबाइलवरून व्हाट्सऍप कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते.
सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारून कारवाई करत तीन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. सुटका केलेल्या मुली छत्तीसगड, राजस्थान आणि मुंबई येथील आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.