Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेकडून सोमवारच्या माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानाची तयारी पूर्ण

सांगली महापालिकेकडून सोमवारच्या माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानाची तयारी पूर्ण :  उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडून तयारीचा आढावा सांगली जिल्ह्यातील अनेक संस्था संघटना सहभागी होणार


सांगली: प्रदूषण व अस्वच्छतेच्या विळख्यातुन बाहेर काढून कृष्णा नदीने मोकळा श्वास घ्यावा, गतवैभव प्राप्त करून सांगलीकरांसाठी आकर्षण केंद्र व्हावे यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी सांगली येथील कृष्णा नदीच्या काठावरील सरकारी घाट, माई घाट(समर्थ घाट) या ठिकाणी  "माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत "कृष्णामाई स्वच्छता अभियान" आयोजित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम होत आहे. 

या तयारीचा आढावा उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी शनिवारी घेतला. सोमवार दि. २१/०२/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते ०२.०० वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेच्या तयारीची पाहणी शनिवारी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी केली. यावेळी सहायक आयुक्त नितीन शिंदे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, आरोग्य विभागाच्या प्रेरणा चव्हाण, समीर झारी, अनिल वाघमारे, ज्योतिराम मेंढे, सचिन कांबळे, सचिन सावंत, रफिक शेख , प्रेम कांबळे आदी उपस्थित होते.

माझी कृष्णामाई स्वछता अभियानात सहभागी व्हा: आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन

सोमवारी होत असणाऱ्या माझी कृष्णामाई स्वछता अभियानात सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था यांनी सदर माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानांतर्गत कृष्णा नदी परिसर स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडील स्वच्छतेकामी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह या अभियानात सहभागी होऊन आपली कृष्णामाई स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

असे असेल नियोजन

सोमवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत सांगलीच्या कृष्णा नदीच्या सर्व घाटावर एकाचवेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी,सामाजिक संस्था, विद्यार्थी यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या सामाजिक संस्था तसेच पर्यावरण प्रेमी नागरिक यांनी स्वामी समर्थ घाट येथे आपल्या उपस्थितीची नोंद करायची आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छता करण्याचे ठिकाण देण्यात येईल. यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून नोंदणी व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी असेल पार्किंग व्यवस्था

माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानासाठी जिल्हाभरातून संस्था, संघटना, एनजीओचे लोक येणार आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाकडून टिळक चौकातील जनावर बाजार, स्वामी समर्थ मंदिरासमोरील मोकळे पटांगण आणि वसंतदादा स्मारक समोरील पटांगण या ठिकाणी चारचाकी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता मोहोमेसाठी येणार्यांनी आपली वाहने रस्तावर न लावता वरील तीन ठिकाणी मैदानावर पार्कींग करावीत असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.