अनिल देशमुख आठवडाभर "टिकले"; पण नवाब मलिक दुसऱ्याच दिवशी हेडलाईन्समधून "व्यक्ती" म्हणून "गायब"!!
नाशिक : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, इन्कम टॅक्स यांच्या कारवायांच्या मुद्यावर दररोजच्या मीडियातल्या हेडलाइन्स गाजणे याला आता 5 - 6 महिने उलटून गेलेत.यामध्ये अनेक नेत्यांची नावे हेडलाईन मध्ये आली आणि गेली. पण नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीत जी प्रचंड अस्वस्थता तयार झाली विशेषतः शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे अन्य नेते यांनी ज्या प्रकारे तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातून नवाब मलिक हे पुढचे कित्येक दिवस महाराष्ट्राच्या मीडियातील "हेडलाईनचे धनी" बनतील, ती असे वाटत होते. पण हेच नवाब मलिक कोठडीत जाऊन एकच दिवस उलटतो ना उलटतोय तोच नवाब मलिक हेडलाईन मधून "व्यक्ती" म्हणून "गायब" झाले आहेत.
अनिल देशमुख यांना जेव्हा अटक झाली त्याच्या आधीपासून ते मराठी मीडियातली "हेडलाईन"ची जागा राखून ठेवत होते. सुरुवातीला अनिल देशमुख नेमके कोठे आहेत? म्हणजे ते कोठे गायब झाले आहेत? त्याच्या हेडलाईन झाल्या. नंतर ते ईडी कार्यालयात हजर झाले, तायाच्या हेडलाईन झाल्या. त्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्याच्या जवळजवळ 8 - 10 दिवस हेडलाईन होत होत्या. म्हणजे अनिल देशमुख हे नाव "व्यक्ती" म्हणून किमान 8 ते 10 दिवस मीडियाच्या हेडलाईन मध्ये झळकत होते. पण त्या वेळी संजय राऊत किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया तेवढ्या प्रमाणात हेडलाईन म्हणून झळकले नव्हत्या. प्रतिक्रिया येतच होत्या. त्यांच्या बातम्याही मीडियात येत होत्या. पण हेडलाईन मात्र अनिल देशमुखांच्या "व्यक्ती" म्हणून होत होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.