सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
नागपूर : परस्पर सहमतीने शारीरिक संबंधांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सज्ञान महिलेनं स्वत:च्या मर्जीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषास बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने यावेळी दिला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या अनेक घटना घडत असतात. बऱ्याचदा त्यावरून कोणालातरी गोत्यात आणण्याचेही प्रकार होतात. प्रेमसंबंधात दुरावा, कटूता आल्याने महिलांकडून अनेकदा लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारी दाखल केल्या जातात. त्यामुळे आता याविषयी निर्वाळा नागपूर सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे.
सागर चुन्नीलाल दडुरे असं संबंधित आरोपीचं नाव आहे. शिक्षण सुरू असताना सागरची ओळख फिर्यादी मुलीसोबत झाली. नजदिकच्या काळात दोघांनी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. मात्र सागर यानं कुटुंबाच्या विरोधामुळे फिर्यादी मुलीशी विवाह करण्यास नकार दिला. हा खटला नागपूर सत्र न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष सुटका केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.