सोने-चांदीच्या दरात जोरदार घसरण
२८ फेब्रुवारी २०२२ : रशिया आणि युक्रेनमधील संकटाचा थेट परिणाम सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीवर दिसून आला. गेले काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने उसळी दिसून आली.मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात जोरदार घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारपेठेत सकाळच्या सत्रात १० ग्रॅम सोने १३५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी २०६० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,४०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६५,५२० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
गेल्या आठवड्यात रशिया-युक्रेन तणावामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून सोन्याला पसंती दिल्यानं सोन्याच्या भावानं ५२ हजारांचा टप्पा पार केला होता. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोने तब्बल ११९० रुपयाने महागले होते. तर चांदी १४८० रुपयांनी महागली होती.
गेल्या आठवड्यात सोने जवळपास १५०० ते १६०० रुपयाने महागले होते. त्याचबरोबर चांदीत २५०० रुपयाची वाढ दिसून आलीय. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,२९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,२५०, बुधवारी ५१,५१०, गुरुवारी ५१,५६०, शुक्रवारी ५२,७५० रुपये प्रति तोळा इतका होता. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,०८०, बुधवारी ६५,८५०, गुरुवारी ६६,१००, शुक्रवारी ६७,५८० रुपये प्रति किलो इतका होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.