आधी तोंडात बोळा कोंबला मग हातपाय बांधून जिवंत जाळलं; सुनेसोबत क्रूरतेचा कळस, कारण समोर
नवादा, 20 फेब्रुवारी: हुंड्यासाठी सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण नवाद याठिकाणी मात्र सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी अमानुषतेच्या सर्व परिसीमा गाठल्या आहेत.
आरोपींनी सुनेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हातपाय दोरीने घट्ट बांधून तिला जिवंत जाळलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कोमल कुमारी असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. त्या बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील अरमा बंसीपूर येथील रहिवासी होत्या. 1 मे 2019 साली कोमल यांचा विवाह शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महारथ काशीचक गावातील कृष्णा कुमार याच्याशी झाला होता. आरोपी कृष्णा कुमारचे वडील पोलिसांत नोकरी करतात.
याचाच फायदा घेऊन आरोपी पती कृष्ण कुमार आणि त्याचे कुटुंबीय मृत कोमल कुमारीचा हुंड्यासाठी छळ करत होते. विशेष म्हणजे लग्नात मोठा हुंडा देऊन धुमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. तरीही आरोपींकडून सातत्याने हुंड्याची मागणी केली जात होती. औरंगाबादेत शिवसेना आमदाराकडून भावजयीस बेदम मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर अलीकडेच आरोपींनी माहेरून स्कॉर्पियो आणण्यासाठी मृत कोमलवर दबाव टाकला होता.
पण स्कॉर्पियो गाडी देण्यास नकार दिल्यानंतर जावई कृष्णा कुमार यांनी कोमलला बेदम मारहाण केली होती, अशी माहिती मृत कोमलचा भाऊ राहुल याने दिली आहे. घटनेच्या दिवशी शुक्रवारी देखील आरोपींनी पीडितेला बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबला होता. त्यानंतर तिचे हातपाय बांधून तिला जिवंत जाळलं.
यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतीत कोमलला पावापुरी येथील रुग्णालयात दाखल केलं. स्मशानात मुलींच्या फोटोसोबत अघोरी कृत्य,कोल्हापुरात अंधश्रद्धेचा किळसवाणा प्रकार तसेच स्वयंपाक करत असताना कुकरचा विस्फोट झाल्याने कोमल भाजली असल्याचा दावा सासरच्यांनी केला होता. पण शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मात्र वेगळंच सत्य सांगितलं आहे. कोमलला आरोपींनी जिवंत जाळल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.
पीडितेनं मदतीसाठी कोणालाही बोलावू नये म्हणून तिच्या तोंडात बोळा कोंबल्याचा संशय शेजाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपी पतीसह दोन नणंद आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हत्येच्या या भयंकर घटनेनंतर आरोपींनी संबंधित खोली धुतली होती, तरीही जाळल्यानंतर पडलेले अवशेष खोलीमध्ये आढळून आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.