मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील शैलेश रामचंद्र धुमाळ, सावकारी टोळी तडीपार
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार शैलेश रामचंद्र धुमाळ टोळीस मा. पोलीस अधीक्षक, दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्हयातुन ०६ महिने कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.
मिरज ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख
१) शैलेश रामचंद्र धुमाळ, वय ५५ वर्षे,
२) अशिष शैलेश धुमाळ, वय ३० वर्षे,
३) जावेद बंडु कागवाडे, वय ३५ वर्षे,
४) अमोल आनंदा सुतार, वय ३५ वर्षे
५) सुरेश हरी शिंदे, वय ५६ वर्षे,
६) बाबासो बापु हेरवाडे, वय ६३ वर्षे, सर्व रा. म्हैशाळ, ता. मिरज या टोळीविरुद्ध सन २०१९० व २०२९ मध्ये बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करुन लोकांना पैसे देवुन दिलेल्या पैशावर भरमसाठ व्याज लोकांचे कडुन पैसे तसेच जागा, जमीन, इमारत अशा मालमत्ता बळकावुन कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करणे असे शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे ०६ दखलपात्र व ०२ अदखलपात्र गुन्हे व तक्रारी अर्ज दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग मिरज यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच पोनि मिरज ग्रामीण पो. ठाणे यांचा गोपनिय अहवाल त्यांच्या हालचाली, टोळीतील सदस्यांनी दिलेले म्हणणे, या बाबी विचारात घेऊन, त्यांची सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन
१) शैलेश रामचंद्र धुमाळ, वय ५५ वर्षे,
२) अशिष शैलेश धुमाळ, वय - ३० वर्षे,
३) जावेद बंडु कागवाडे, वय ३५ वर्षे,
४) अमोल आनंदा सुतार, वय - ३५ वर्षे
५) सुरेश हरी शिंदे, वय ५६ वर्षे,
६) बाबासो बापु हेरवाडे, वय ६३ वर्षे, सर्व रा. म्हेशाळ, ता. मिरज. यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली जिल्हयातुन ०६ महिने कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक, श्री. दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुघुले यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, स्था.गु.अ. शाखा सांगली, पोनि चंद्रकांत बेदरे, मिरज ग्रामीण पो. ठाणे सपोफो/सिध्दाप्पा रुपनर, पोहेकॉ/ संजय पाटील, पोकॉ/दिपक गट्टे स्था. गु.अ. शाखा सांगली, पोहेकॉ/ प्रविण वाघमोडे, पोना/अशफाक शेख मिरज ग्रामीण पो. ठाणे यांनी भाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.