Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार डॉ. संजय ओक तसेच स्व.राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार श्रीमती उषादेवी पाटील यांना जाहीर

स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार डॉ. संजय ओक तसेच स्व.राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार श्रीमती उषादेवी पाटील यांना जाहीर


सांगली :- श्रीमती राजगती नेगगोंडा पाटील ट्रस्ट, सांगली याचवतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय स्व. नेगगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार 2022 यावर्षी प्रख्यात सर्जन व महाराष्ट्र काविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, मुंबई यांना राज्यातील कोरोनाच्या वाढल्या प्रादुर्भाव कालावधीत टास्क फोर्सच्या माध्यमातून केलेल्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल दिला जाणार असून, जनसेवा पुरस्काराचे स्वरूप 50000/- रु. रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. तसेच स्वराजनती नेमगोंडा पाटील विशेष सेवा पुरस्कार 2022 श्रीमती उषादेवी अण्णासाहेब पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, सांगली यांना सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणार असून, पुरस्काराचे स्वरूप 11000/-रु. रोख, मानचिन्ह, शाल च श्रीफळ असे आहे. यंदाचा 31 या पुरस्कार वितरण सोहळा व नेमगोडा दादा पाटील यांच्या 49 व्या पुण्यतिथी निमित्त सोमवार दि. 20 फेब्रु. 2022 रोजी सांय 4.00 वा राजमती भवन, नेमिनाथनगर, सांगली येथील वातानुकुलित सभागृहात डॉ. शिवानंद सोरदूर, सुप्रसिध्द हृदयरोगतज्ञ, मिरज यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, 2022 सालच्या स्वनमगोडा दादा पाटील जनसेवा पुरस्काराचे मानकरी असलेले डॉ. संजय ओक है प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सा आणि लॅप्रोस्कोपी क्षेत्रातील विशेषश च महाराष्ट्र कोविंड टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द आहेत. राज्यातील कोरानाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणा-या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि एकूणच कोरोना उपचारांचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने डॉ. संजय ओक याच्या अध्यक्षतेखाली विशेष टास्क फोर्सची स्थापना कली होती. या टास्क फोर्सकडून राज्यातील संपूर्ण कोरोना परिस्थतीवर लक्ष ठेवण्यात येते होते. मुंबईतील उपचाराला दिशा देताना तसेच उपचारात समानता आणताना जगभरातील कोरोना उपचाराचा अभ्यास केला. तसेच सातत्याने होणारी वाढ, त्याची कारणे तसेच गंभीर रुग्ण व उपवार यांचा नियमित आढावा घेतानाय नायर व शीव रुग्णालयात जावून रुग्णालयीन उपयार व्यवस्थेला गती देण्याचे काम डॉ. संजय ओक यांनी केले.

कोरोना व्हायरसच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी विमानप्रवासवर निर्बंध प्रवाशांची RTPCR चाचणी बाधीत देशातून येणा-या विमानांवर बंदी किंवा प्रवाशांना सक्तीच कॉरेंन्टाईन यासारखे उपाय सुचना राबविल्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार रोखू शकला. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुस-या आणि तिस-या लाटेमध्ये आर्थिक चक्राला गती देण्यासाठी सर्वसामान्यांच जीवन अधिक सुसडा करण्यासाठी समतोल समन्वय मध्य साधण्याची गरज लक्षात घेवून टास्क फोर्सने अनेक बैठक घेवून शासनाला निबंध कसे शिथिल करता येतील याबाबत सुचना केल्या. ज्यामध्ये गारक, सोशल डिस्टसिंग, शक्य तेथे वर्क फॉर्म होन या प्रणालीचा वापर कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती क्यू आर कोड आय. डी कार्ड असलेल्या व्यक्तींना लोकलमध्ये प्रवेश देणे या सर्व बाबींचा अंतर्भाव आहे.

कोरोनामुळे जीवन गमवावे लागलेल्या कोविडयोध्दांसाठी डॉ. संजय ओक यांनी अनेक डॉक्टर्स, पत्रकार यांच्या माध्यमातून 'नॅशनल कोविड मेमोरियल ही वेबसाईट तयार केली या उपक्रमांच्या माध्यमातून आपण आपल्या माणसांना श्रध्दांजली वाहू शकतो. डॉ. संजय ओक मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्यासाठी प्रमुख वैद्यकीय शिक्षण संचालक होते. मुंबई महाराष्ट्र आणि भारतीय वैद्यकशिक्षण व वैद्यक व्यवसायातील एक अग्रगण्य व्यक्ती तसेच उत्तम सर्जन, शल्यचिकित्सक, प्रशासक आणि धोरणात्मक सल्लगार म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी गिरज मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेत 1983 11986 दरम्यान वानलेस शुश्रुषालय, मिरज येथे कनिष्ठ, वरिष्ठ आणि मुख्य निवासी पदावर अनुभव मिळवला आहे. सांगलीत 350 बेडसचे भव्य स्वरूपात साकारात असलेल्या उषःकाल अभिनव इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ये ते मार्गदर्शक आहेत. मराठीतील विख्यात लेखक आणि साप्ताहिक सांभलेखक आहेत. त्यांनी माळ्यावरच बाळ, नशेमन, महाभारत, संजय उवाय जगज्जेते, माणुस बुका का करतो ? यासारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये डॉ. एस.एस. मिश्रा नॅशनल अकॅडमी अवार्ड, ओ.पी. तनेजा एन्डोवमेंट अवार्ड, डॉ. एस. रंगाचरी पारितोषिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती परितोषिक, बालरोग शास्त्रातील लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियच्या विकासासाठी बी. सी. रॉय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या त्याच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा स्वनमगोडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार 2022 प्रदान करणेत येत आहे.

तसेच स्व राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार 2022 चे मानकरी असलेल्या सांगलीच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती उपादेवी अण्णासाहेब पाटील यांनी आयुष्यभर प्रमाणिकपणे महापालिकेच्या शाळेतून अध्यापन करत ज्ञानदानाचे काम केले. स्वतःच्या कुटुबाला उभे करून समाजकार्यात हातभार लावला. आपल्याकडील काही पुजी आणि दागदागिणे ही संपत्ती सत्कारणी लागावी यासाठी त्यांनी आपल्याकडील सर्व दागदागिणे विकुण 11 लाखाची मदत सांगलीतील संवेदना सुश्रुषा केंद्राच्या संवेदना घर यासाठी दिली अंथरूणावर खिळल्या वृध्दाची सेवा सुश्रुषा येथे केली जाते. या केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून वृध्दाची आयुष्याची संध्याकाळा सुखद आणि आनंददायी जावी यासाठी आत्मीयतेतून दिलेल्या निधीतून पहिल्या मजल्यावर श्रीमती उपादेवी अण्णासाहेब पाटील सेवासदन विकसित करण्यात येत आहे. तसेच बाहुबली म्हैसाळ येथील आश्रम बांधकामसाठी कळत्रे आक्का प्राथमिक शाळेच्या खोली बांधकामसाठी भिलवडी येथे मंदीर उभारण्यासाठी भरीव देणगी दिली आहे त्यांना सन 1993 साली आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या त्यांच्या कार्याच्या गौरव म्हणून त्यांना यंदाचा स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेष सेवा पुरस्कार 2022' प्रदान करणेत येत आहे.

या ट्रस्टच्यावतीने यापूर्वी स्वनेमगोडा दादा पाटील जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यामध्ये क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, शांतीलालजी मुथा, श्रीमती मेघा पाटकर, डॉ. डी. के. गोसावी आण्णासी हजारे, आर. के. लक्ष्मण, डॉ. प्रकाश कल्याण गंगवाल, डॉ. विलास सगळे प्रा. रा. ग. जाधव, राजेंद्रसिंह राणा फादर फ्रान्सीस दिब्रेटी प्रा. म. द. हातकणंगलेकर, संजय खोपडे, लक्ष्मीकांत देशमुख, अॅड बस्तू रंगे, निलीमा मिश्रा, श्रीमती चेतना सिन्हा, डॉ. तात्याराव लहाने, सुरेश खानापूरकर, र अभय बंग, डॉ. जगन्नाथ दिक्षित तर स्वराजमती नमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार 2022 विदुलता शहा, डॉ. लीला झाडबुके, स्वा. सैनिक राजमती बिरनाळे, मेहरूनिस्सा दलवाई, उषा मेहता, विद्या बाळ, प्रा.रेवती हातकणंगलेकर, डॉ. एस. ए बाळ पळसुले, श्री. संजीव माने, डॉ. माधुरी पाटील, विजयाताई लवाटे, सुश्री. आचार्या चंदनाजी, नसीमा हुअरूक, सौ मनिया विलास शिंदे या मान्यवरांचा समावेश आहे.

यावेळी ट्रस्टी प्रमोद पाटील, प्रितम चौगुले हे उपस्थित होते. सदर सत्कार समारंभस नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी यावेळी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.