वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून महापालिकेच्या माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षणाची जनजागृती सुरू: उपायुक्तांच्या उपस्थितीत पथनाट्याची सुरवात
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या माजी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 अभियानाची वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती सुरू केली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शननाखाली हे पथनाट्य सुरू आहेत.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात शासनाचे स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियान मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनाखाली प्रभावीपणे राबविले जात आहे. या अंतर्गत नुकतीच विशेष स्वच्छता मोहीम घेणेत आली. यामध्ये 130 टन कचरा महापालिका प्रशासनाकडून संकलित करण्यात आला. आता या अभियानाची जनजागृती करण्यासाठी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी पुढे आले आहेत. महाविद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांच्या ग्रुपकडून आता महापालिका क्षेत्रात पथनाट्याद्वारे स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती सुरू करण्यात आली आहे. यासाठी या विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे पथनाट्य तयार केले असून मनपा क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी हा ग्रुप पथनाट्य सादर करणार आहे.
आज विश्रामबाग गणपती मंदिरापासून उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत या पथनाट्याची सुरवात करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त एस एस खरात, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, अंजली कुदळे, कोमल कुदळे, प्रणिल माने आदी यावेळी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.