देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण वर्गाच्या वतीने सलग आठ तास रिले मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कोल्हापूर दिं.२१: देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण वर्गाच्या वतीने सलग आठ तास रिले मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अवघ्या साडेतीन वर्षाच्या तनिश अभिजीत जाधव याने सहभागी होऊन विक्रम केला. त्याबद्दल त्याला राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिकाने गौरविण्यात आले.
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्केटिंग अकॅडमी च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या. या मॅराथॉन स्पर्धेत हजारो स्केटिंगपटू सहभागी झाले होते. सलग आठ तास रिले मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक आणि वर्ल्ड बुक साठी नोंद झाली आहे.
या उपक्रमाची सुरुवात बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांच्या हस्ते शिव पूजनाने करण्यात आली.यावेळी दत्ताजीराव वाळके, महेश वाळके, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे, अतुल शहा, राहुल स्वामी उपस्थित होते.
शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सलग आठ तास स्केटिंग विक्रम हा उपक्रम राबवण्यात आला. कोल्हापुरातील राजश्री शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख महेश कदम, तेजस्विनी कदम, अॅड. धनाजी कदम यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा पार पडली.हजारो शौकिनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या स्पर्धेत अवघ्या साडेतीन वर्षाच्या तनिश अभिजीत जाधव हा या स्केटिंग स्पर्धत अत्यंत उत्साहाने सहभागी झाला होता.त्याचा उत्साह आणि खेळ पाहून अनेकांनी त्यांची वाहवा केली.त्याला राष्ट्रीय पातळीवरील प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. त्याच्या या यशात या प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख महेश कदम,त्यांचे वडील अभिजीत,आई तेजस्विनी यांचा मोठा सहभाग आहे.
तनिश अभिजीत जाधव यांने अत्यंत लहान वयात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांचा तनिश हा नातू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.