Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरल्यास होऊ शकते शिक्षा

 मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरल्यास होऊ शकते शिक्षा


एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या बँकेतून एटीएम मधून पैसे काढणे बेकायदा असून नॉमिनी सुद्धा बँकेला रीतसर कळविल्याशिवाय मृत व्यक्तीच्या खात्यातून एटीएम कार्ड वापरून पैसे काढू शकत नाहीत. असे पैसे काढले गेले तर तो गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

आजकाल डिजिटल बँकिंग आणि एटीएम सुविधेमुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन पैसे काढण्याची गरज राहिलेली नाही. खात्यातून कोणत्याही वेळी पैसे काढणे सोपे झाले आहे. पण त्यामुळे फ्रॉडचे अनेक प्रकार नित्यनेमाने समोर येत आहेत. अनेकदा परिवारातील कुणा व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबातील व्यक्ती परस्पर एटीएम मध्ये मृत व्यक्तीचे कार्ड वापरून पैसे काढून घेतात असे दिसून आले आहे. पण असे करणे बेकायदा आहे आणि पकडले गेले तर शिक्षा होऊ शकते. कायद्यानुसार मृत्यूनंतर त्या खात्यातून परस्पर पैसे काढणे चूक आहे.

मृत व्यक्तीची संपत्ती जोपर्यंत नॉमिनी किंवा अन्य वारसाच्या नावावर ट्रान्स्फर करून घेतली जात नाही तो पर्यंत मृत व्यक्तीच्या पैश्यांबाबत काही करता येत नाही. व्यक्तीच्या मृत्यूची सूचना प्रथम बँकेला द्यावी लागते. जो नॉमिनी असेल तो बँकेची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पैसे घेऊ शकतो. दोन नॉमिनी असतील तर दुसऱ्याचे सहमती पत्र द्यावे लागते. पैसे क्लेम करताना एक फॉर्म भरावा लागतो आणि त्यासोबत मृत व्यक्तीचे पासबुक, अकौंट टीडीआर, एटीएम, चेकबुक, डेथ सर्टिफिकेट, वारसाचे आधार कार्ड, पॅन अशी कागदपत्रे बँकेला द्यावी लागतात आणि मग मृत व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढून खाते बंद करता येते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.