भारताने हल्ला केल्यास पाकिस्तानी सैन्य तयार; इम्रान खानने भारताला दिली धमकी
इस्लामाबाद : पाकिस्तान बालाकोट एअर स्ट्राईकचा फटका पूर्णपणे विसरला नाही. यामुळेच बालॉक एअरस्ट्राईकवर इम्रान खानने भारताला पुन्हा युद्धाची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. 20 फेब्रुवारी 2019 रोजी, बालाकोट एअर स्ट्राइक केली होती. तर पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय लष्करी तळांवर अयशस्वी प्रतिहल्ला सुरू केला होता. आता त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त इम्रान खान यांनी ट्विट करून बरेच विष ओकले आहे. केवळ इम्रान खानच नाही तर पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्या ताकदीचे जोरदार कौतुक केले. 2019 मध्ये या दिवशी भारतीय अयशस्वी दु:साहसाला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावाही ट्विटरवर पाकिस्तानी लष्कराने केला आहे. तर, सत्य हे आहे की भारतीय वायुसेनेचे तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन यांनी त्यांच्या जुन्या मिग-21 बायसनमधून पाकिस्तानी हवाई दलाचे अधिक प्रगत F-16 लढाऊ विमान पाडले होते.
इम्रान म्हणाला- पाकिस्तानी लष्कर उत्तर देण्यासाठी तयार आहे
संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे, असे अभिमानाने इम्रान खान यांनी ट्विट केले आहे. हे कधीही दुर्बलतेचे लक्षण मानू नये. जसे आम्ही 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताला दाखवले. त्यांनी पुढे लिहिले की, जेव्हा जेव्हा भारत आपल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा राष्ट्राच्या पाठिशी असलेले आपले सशस्त्र दल सर्व स्तरांवर आक्रमकपणे प्रत्युत्तर देतील. आपल्या देशाच्या आणि आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेमध्ये स्थिर आणि अटल आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.