मा.ज्योती आदाटे यांना ना.मा. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर (आरोग्य व सांस्कृतिक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते समाज जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मा.ज्योती आदाटे यांना ना.मा. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर (आरोग्य व सांस्कृतिक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते समाज जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावातील फुले शाहू आंबेडकर विचारमंच च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना नामदार साहेब आपल्या भाषणात म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे या पदावर आल्यापासुन अगदी झंझावाताप्रमाणे कार्यरत आहेत अगदी सांगली च्या इतिहासात कधीच घडले नाही अशा पध्दतीचे कामकाज करून सर्वांना अचंबित करुन टाकले आहे अगदी समर्पित भावनेने भागाभागात जाऊन या कोरोणाच्या महामारीच्या काळात सुध्दा जिवाची पर्वा न करता या योजनेबाबत समाजजागृती करीत आहेत जेणेकरून प्रत्येक वंचित घटकातील लाभार्थ्यांना न्याय मिळेल.
अतिदुर्लक्षित अशा वारांगना च्या दारातसुध्दा या समितीला नेऊन आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन शुन्यातून विश्व निर्माण केले आहे शालेय जीवनापासून च विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुरोगामी चळवळीत उडी घेतली अन्याय अत्याचाराच्या विरोधात शोषणाविरुद्ध लढे देऊन लढवय्यी कार्यकर्ती म्हणून ओळख निर्माण केली त्यांच्या या झपाटुन काम करण्याच्या वृत्तीमुळे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका त सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागात निवडून येऊन हॅट्रीक नगरसेविका म्हणून मान मिळवला आहे याचं दरम्यान त्या प्रभाग समिती च्या सभापती म्हणून ही जोरात कामगिरी करून दाखवली आहे.
तसेच त्यांनी त्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन समिती सोबत अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश करुन समाजातील अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला आहे समिती सोबत अनेक ठिकाणी जाऊन चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिके सहीत करुन प्रबोधन केले आहे त्या त्यांचे हे कार्य अगदी जीवावर उदार होऊन करीत असतात सांस्कृतिक क्षेत्रात ही त्या अग्रेसर आहेत नाट्य व चित्रपट अभिनेत्री म्हणून त्यांनी या क्षेत्रात ही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे तसेच त्या एक पालक आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न शील असणार्या आकार फौंडेशन च्या ट्रस्टी आहे त त्यांनी सुध्दा शैक्षणिक प्रायोजक म्हणून एक मुलगी दत्तक घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला समाजजागृती पुरस्कार देताना अभिमान वाटतोय यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा. प्रकाश पाटील-टाकवडेकर (माजी सभापती व अध्यक्ष- शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजना); सौ. अर्चना चौगुले- (माजी सभापती व विद्यमान सदस्या पंचायत समिती शिरोळ); पी. वाय. पाटील- (सरपंच); सौ. धनश्री निर्मळ- (उपसरपंच); सौ. सारिका पाटील- (पोलीस पाटील); संजय कांबळे- (लेखा परिक्षक, पुणे); संतोष बामणे- (दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी); विचारमंचचे संस्थापक आणि आयोजक- राजेंद्र कांबळे- (पत्रकार दैनिक पुढारी); अध्यक्ष- अशोक कांबळे; उपाध्यक्ष- सतिश कांबळे; सचिव- रमेश कांबळे; कार्याध्यक्ष- आकाश कांबळे (विशेष कार्यकारी अधिकारी); पत्रकार- शिवाजी येडवान; मयुर चिंदे; हुमायून नदाफ; बबन जामदार आणि त्यांच्या सारथी प्रियांका तुपलोंडे आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.