वेब सीरिज पाहण्याचे व्यसन असलेल्या १२ वर्षांच्या मुलाने केले हे गंभीर कृत्य
बॉलीवूड मधील घटनांचे अनुकरण करून काही वेळा बालक, किशोरवयीन मुले किंवा तरुण अचाट कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या काळात सोशल मीडियाचे भूत अनेकांच्या अंगात घुसले आहे, असे म्हटले जाते.
एका मुलाने वेब सिरीज मधील प्रकार पाहून तसे अचाट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार त्याच्या जीवाशी बेतला. पश्चिम बंगालमधील उत्तर कोलकाता येथे वेब सीरिज पाहण्याचे व्यसन असलेल्या 12 वर्षीय मुलाने एका अपार्टमेंटच्या 11व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. प्लॅटिनम एंड या वेबसिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे वेब सीरिजचा सुपरहिरो त्याला वाचवण्यासाठी येईल, या आशेने मुलाने त्याच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरून उडी मारल्याचे पोलिसांना तपासा दरम्यान आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चमत्काराच्या आशेने 12 वर्षांच्या मुलाने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव गमावला. ही जपानी मालिका एका काल्पनिक कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये किशोरवयीन नायकाने इमारतीच्या छतावरून उडी मारली, परंतु एका परीने त्याला वाचवले आणि त्यानंतर नायकाने जादूची शक्ती विकसित केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानंतर आम्हाला खात्री झाली आहे की हा मुलगा मालिका पाहण्याच्या व्यसनाचा बळी होता आणि यातूनच प्रेरित होऊन त्याने हे जीवघेणे पाऊल उचलले. ही घटना कोलकाता येथील पार्क सर्कसच्या फूल बागान भागातील एका उच्चस्तरीय संकुलात घडली.
बिराज पचिसिया असे या 12 वर्षीय मुलाचे नाव असून कुटुंबातील सर्व सदस्य घरी सरस्वती पूजनात व्यस्त असताना बिराजने गच्चीवर उडी मारली. आवाज ऐकून गृहसंकुलातील रहिवासी धावत पूलाच्या बाजूला गेले आणि त्यांना पार्क सर्कस येथील एका प्रीमियर शाळेचा विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला जवळच्या नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तसेच पोलिसांनी सांगितले की, मुलाला ऑनलाइन क्लाससाठी इलेक्ट्रॉनिक गॅझेट दिले होते, परंतु त्यामुळे वेब-सिरीज पाहण्याची सवय लागली. परिस्थितीजन्य पुरावे पाहता आम्हाला स्पष्टपणे खात्री आहे की मुलाला वेब-सिरीजचे इतके व्यसन होते आणि असे मानले जाते की त्याने जे काही पाहिले तेव्हाच त्याने छतावरून उडी मारली. कोलकाता येथील मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात की, ही काही नवीन गोष्ट नाही. या प्रकारच्या मालिका आणि वेब-सिरीज तरुणांच्या मानसशास्त्रावर खोलवर परिणाम करतात. हा एक धोकादायक ट्रेंड आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या मोबाईलमध्ये अशा धोकादायक गोष्टी दिसत नाहीत का ? याकडे लक्ष द्यावे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.