Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हयातील वाहन चालकांवर एम. व्ही अॅक्टनुसार करण्यात आलेल्या कारवाईचा प्रलंबित दंडासाठी न्यायालयात खटला दाखल होणार..

सांगली जिल्हयातील वाहन चालकांवर एम. व्ही अॅक्टनुसार करण्यात आलेल्या कारवाईचा प्रलंबित दंडासाठी न्यायालयात खटला दाखल होणार..


सांगली जिल्हयामध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर ई चलान डिव्हाईस मशीनद्वारे पेड व अनपेड अशा स्वरुपात दंडात्मक कारवाई करण्यात येते. सदयस्थितीत सांगली जिल्हयातील ७३२४५ वाहनधारकांवर १६४६४२ चलनाने ५,३८,६१,०००/- रुपये इतका दंड प्रलंबित असुन सदर प्रलंबित दंडाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडुन वाहनधारकांना लोकअदालतीमध्ये दंड भरणेबाबतच्या नोटीसा मोबाईल संदेशाद्वारे पाठविण्यात आले आहेत.

तरी वाहनधारक यांना आवाहन करण्यात येते की, ज्या वाहन चालक मालक यांचे एम व्ही अॅक्टनुसार प्रलंबित दंड आहेत अशा वाहनधारकांनी आपले प्रलंबित दंड नजीकच्या वाहतुक शाखा किंवा पोलीस ठाणेमध्ये जाऊन दिनांक ११.०३.२०२२ रोजीपर्यंत भरणेच्या आहेत.

जे वाहन चालक/ मालक आपल्या असलेल्या वाहनांवरील व मोबाईल वर प्राप्त झालेला मेसेज, तसेच न्यायालयाकडुन लोकअदालतीच्या नोटीसनुसार आलेल्या प्रलंबित असलेला दंड भरणार नाहीत, त्यांचेविरुध्द मा. न्यायालयात खटला दाखल करणेत येणार आहे, तसेच सदर खटल्याचा निकाल लोक अदालतीमध्ये दिनांक १२.०३.२०२२ रोजी होणार आहे.

मा. श्री. दिक्षीत गेडाम, पोलीस अधीक्षक सांगली, मा. श्रीमती मनिषा दुबुले, अपर पोलीस अधीक्षक व मा. श्री. अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग सांगली यांचे आदेशानुसार ज्या वाहन चालक/ मालक यांचे एम व्ही अॅक्टनुसार दंड प्रलंबित आहेत, त्यांनी सदरचे प्रलंबित असलेले दंड भरावेत अन्यथा त्यांचेविरुध्द मा. न्यायालयात खटला दाखल केला जाईल असे आवाहन प्रज्ञा देशमुख, नोडल ऑफीसर तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, सांगली यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.