फडणवीसांचा वार गेला नाही खाली, नवाब मलिकांच्या अटकेवर म्हणाले...
मुंबई, 23 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मलिक आणि दाऊदचे कसे संबंध आहे,हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. आज याच प्रकरणात मलिक यांना ईडीने अटक केली असून 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. या घडामोडीनंतर फडणवीसांनी आपली सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी आरोपींची मालिका सुरू केली होती. याच वेळी मलिकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले होते. पण आज मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली आणि कोठडी मिळाली.'मुळात हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएने मधल्या काळात एक ऑपरेशन केलं होतं. दाऊद प्रॉपर्टीच्या माध्यमातून देशात मनी लाँड्रिंग केलं होतं. सात ठिकाणी एनआयने छापे टाकले. यातील एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधीत आहे. मलिक यांनी जी काही जमीन घेतली, सरदार पटेल हा हसिना पारकरचा राईट हँड आणि ड्रायव्हर होता, असा खुलासा फडणवीसांनी केला.
तसंच, 'जमिनीचे मालक आहे त्यांना एकही पैसा मिळाला नाही, असा दावा त्यांनी केला. फक्त अतिक्रमण काढण्यासाठी जमिनीच्या कागदपत्रात माहिती दिली होती. पण त्यांना एकही पैसा मिळाला नाही. हसिना पारकर येत होती आणि तिथे व्यवहार करत होती. हसीना पारकरला 45 लाख रुपये देण्यात आले आहे. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने मलिकांना पैसे मिळाले होते. मलिकांनी हे पैसे दाऊदला दिली. हे पैसे दाऊदला हसिना पारकरच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी करण्याचे कारण काय, हसीना पारकरसोबत व्यवहार करण्याचे कारण काय? असा सवाल फडणवीसांनी केला.
'अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिक यांना जमीन मिळाली. हजरो कोटीची जमीन मलिक यांना मिळाली आणि त्याचे पैसे थेट दाऊदला मिळाले. आता प्रश्न एवढाच निर्माण होतो, एक कॅबिनेट मंत्री मुंबई स्फोटातील आरोपींशी व्यवहार कसा करू शकतो? असा सवालाही त्यांनी विचारला.'या व्यवहारानंतर मुंबईमध्ये तीन हल्ले झाले होते, जे लोकं आपल्या मुंबईवर स्फोट घ मुंबई स्फोटातील आरोपी आणि देशातील सर्वात मोठ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याच्या बहिणीशी व्यवहार कसा केला जाऊ शकतो. यातला टेरर फंडिंगाचा आरोप स्पष्ट दिसत आहे. जमिनीच्या मालकांनी पैसे आपल्या मिळाले नाही, असं सांगितलं. ईडीने नियमांना धरून कारवाई केली आहे, असंही म्हणत ईडीची फडणवीसांनी पाठराखण केली.
'माझ्याकडे असलेले सर्व कागदपत्र ईडी, एनआयए, सीबीआय ला पाठवले होते. अतिशय चुकीचा पायंडा पाडला जातोय, राजकीय गुन्ह्यांत अटक नाही. टेरर फंडिंगमध्ये अटक केली. अशाच एक मंत्री राजीनामा देणार नाही ही देशात संविधानिक स्थिती निर्माण होत आहे. राजकारणाचा स्थर इतका खाली पडला, तर एक वाईट पायंडा पडेल. दाऊदशी संबंधीत व्यवहार केलेल्यांचा मंत्र्याला वाचवायला सर्व पार्टी एकत्र आल्या आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी सरकारवर केली.
'सरकारी यंत्रणा खोटेपणा करुन लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांत लवकरच खुलासा करणार आहे. महाराष्ट्र सरकार खोटे साक्षीदार उभे करतात, याबाबत खुलासा करणार आहे', असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला. ' भाजपचं मत आहे की आम्हाला राजीनामा मागण्याची वेळ यायला नको, यांनीच राजीनामा द्यायला हवा, आम्ही यांचा बुरखा फाडू, प्रदेशाध्यक्ष यावर बोलतील' असंही फडणवीस म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.