बलात्काऱ्याला पकडण्यासाठी पोलिस गावात आले; अन् पुढं हे सगळं घडलं
राजस्थानमधील भरतपूर नजिक उचैन येथील बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेले असताना पोलिसांनी आरोपीला पकडून जीपमध्ये बसवताच ५० जणांनी पोलिसांच्या पथकावर लाठी हल्ला केला.
या घटनेत ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगला पट्टी गावात राहणाऱ्या बंटी नावाच्या व्यक्तीवर एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणाचा तपास धौलपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना देण्यात आला. सदर आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता. बलात्काराच्या प्रयत्नातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. पोलिसांची पथके आरोपींच्या शोधात छापे मारत होते.
दरम्यान, आरोपी बंटी त्याच्या घरी आल्याची माहिती उच्छैन पोलीस ठाण्याला मिळाली. त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाट्यासह आरोपीच्या घरी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या गाडीत बसवले. पोलिस तेथून जाण्यासाठी निघू लागताच गावकऱ्यांनी पोलिसांच्या जीपसमोर ट्रॅक्टर लावला आणि अचानक गावातील सुमारे ५० महिला व पुरुषांनी पोलिसांना घेराव घातला. गावकऱ्यांनी पोलिसांच्या पथकावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. ग्रामस्थांच्या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेश कसाना यांच्यासह सुमारे ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. गावकऱ्यांनी आरोपीला पोलिसांपासून दूर पळवून नेले.
पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली, त्यानंतर आणखी तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतरच जखमी पोलिसांना गावातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त एसपी आणि सीओ पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी सध्या पोलिसांची पथके ठिकठिकाणी छापे मारत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.