एकेकाळी बकऱ्यांना चारणाऱ्या आजीबाई आज आहेत प्रसिध्द हॉटेलच्या मालकीन
पुणे-सोलापूर हायवेपासून 55 किलोमीटर अंतरावर चौफुला गावातील एक हॉटेल आपल्या नॉन-व्हेज जेवणासाठी प्रसिध्द आहे. या हॉटेलचे नाव ‘जय तुळजा भवानी’ असे आहे. या हॉटेलच्या मालकीन 68 वर्षीय कुसुमबाई या आहेत. त्यांच्या पतीने 1979 या हॉटेलची स्थापना केली होती.हे हॉटेल अनेक डिशेजसाठी प्रसिध्द आहे. भाजलेले मटन, सुखे मटन, आळणी चिकन आणि वाफेवर बनवण्यात आलेली मटन बिर्याणी अशा अनेक थाळ्या येथे प्रसिध्द आहेत.आपल्या हॉटेलविषयी कुसुमबाई यांनी सांगितले की, 1979 मध्ये पतीने हॉटेल सुरू केले होते. त्यावेळी त्या बकऱ्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम करायचा व पती मल्हार गडदे हे हॉटेल सांभाळायचे.
तेव्हा कुसुमबाई यांची जबाबदारी ही हॉटेलमध्ये बनणाऱ्या पदार्थांसाठी मसाला तयार करणे ही होती. मसाले त्या घरीच तयार करायच्या. हॉटेल जोरात चालू लागल्यावर कुसुमबाई देखील हॉटेलमध्येच काम करू लागल्या. आजही हॉटेलचे मसाले घरीच तयार केले जातात.आजही कुटुंबातील अनेक सदस्य त्यांच्याबरोबर हॉटेलची जबाबदारी सांभाळतात. वाफेवर तयार करण्यात येणारी मटन दम बिर्याणी बनवण्यासाठी तीन तास लागतात. तर मटन थाळीसाठी खास चुलीचा वापर करण्यात येतो.या हॉटेलमध्ये एवढी गर्दी असते की, दोन-तीन तास आधी ऑर्डर द्यावी लागते. द ग्रेट खली देखील या हॉटेलमध्ये येऊन गेला आहे. 68 वर्षीय कुसुमबाई आपल्या कुटुंबाबरोबर हे हॉटेल संभाळतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.