माझी वसुंधरा अभियानातून एकाच दिवशी ५० शाळांकडून ५० जलपुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती - विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणपूरक संदेश
सांगली: माझी वसुंधरा अभियानातून सांगली मिरज आणि कुपवाड शहरात एकाच दिवशी ५० शाळांकडून ५० जलपुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळातील विद्यार्थ्यांनी जलपुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती करत प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणपूरक संदेश दिला आहे.
महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये जलपुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती करून याद्वारे जलसंवर्धन करण्याबरोबर विद्यार्थ्यांना पाणी आडवा, पाणी जिरवा याचे महत्व समजावे आणि जल संवर्धनाची चळवळ अधिक सक्षम बनावी या उद्देशाने आयुक्त कापडणीस यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी महापालिकेच्या 50 शाळांमध्ये एकाच दिवशी जलपुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यानुसार आज महापालिकेच्या 15 शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून जलपुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.