मनसे मराठी कामगार सेना सांगली चा वानलेस हॉस्पिटल मिरज क्रेडिट सोसायटी ला दिला इशारा
आज मनसे मराठी कामगार सेना सांगली व या हाॅस्पिटल कर्मचारी बांधवांच्या कमिटीचा वतीने वानलेस हॉस्पिटल मिरज क्रेडिट सोसायटी ला निवेदन देण्यात आले.
गेली दोन-तीन वर्ष झाली या क्रेडिट सोसायटीचा भोंगळ कारभार चालू आहे. येथील सभासद बांधवांना गेली दोन वर्ष झाले कोणत्याही स्वरूपाचे कर्जवाटप येते चालू नाही, त्याचबरोबर दोन वर्ष झाली सभासदाचा ङिव्हिङंट सुद्धा थकबाकी आहे.
कर्मचार्याने कर्जाची मागणी केली असता त्यांचा अर्ज बाद केला जातो, पैसे नाहीत असे सांगितले जाते या सोसायटीची सभासदांकडून होणारी कर्जवसुली ही जवळपास शंभर टक्के आहे दर महिन्याला हे हॉस्पिटल चे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पगारातून सोसायटीच्या कर्जाची रक्कम कट करते ,असे असताना सभासद या सोसायटीकडून मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहे. सभासदांच्या व कर्मचाऱ्यांच्या या मागणीसाठी व जाब विचारण्यासाठी आम्ही या क्रेडिट सोसायटीच्या सध्या असणाऱ्या माननिय #राॅबिन साठे या प्रशासकांना निवेदन दिले असता. येथील माननीय साठे साहेब यानी आम्हाला हे प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले आहे.
म्हणजेच हे वानलेस हॉस्पिटलचे प्रशासन कागदोपत्री कर्मचाऱ्यांचे कर्जाची रक्कम कट करून घेते परंतु क्रेडिट सोसायटी ला जमा करत नाही म्हणजेच ही क्रेडिट सोसायटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अस्तित्वात आलेली आहे की हॉस्पिटलच्या संचालक मंडळाच्या आर्थिक फायद्यासाठी अस्तित्वात आलेली आहे हा मोठा प्रश्न आहे.
आज आम्ही येथील प्रशासकांना हेच समजावून सांगितलेले आहे येथे आठ दिवसांमध्ये ह्या सभासदांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा मनसे मराठी कामगार सेना या सभासदांसाठी जोरदार लढा उभा करेल. यावेळी मनसे मराठी कामगार सेना सांगली जिल्हा संघटक रोहित घुबडे- पाटील, मिरज तालुका संघटक प्रसाद खवाटे, मिरज तालुका उपसंघटक विजय मौर्य, सांगली शहर उपसंघटक निखिल कुलकर्णी सह वानलेस हाॅस्पिटल मिरज कमिटी चे सुधीर वारे, प्रमोद सौंदडे, मोजेस हेगडे, भास्कर भंडारे, पोपट जाधव ,सचिन चंदनशिवे ,विनायक ठोंबरे ,विनय नांदे ,पावलस खिलारे, अविनाश मोरे सह हॉस्पिटल चे कामगार बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.