Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आईने झापल अन् भांडी घासायला जुंपल, तव्याने वार करून लेकीने घेतला बदला

 आईने झापल अन् भांडी घासायला जुंपल, तव्याने वार करून लेकीने घेतला बदला


असे म्हणतात आई मुलीचे नाते इतर कोणत्याही नात्यापेक्षा फार वेगळे असते. मुलगी आईचा आधार असते मात्र इथे मुलगीच आईचा काळ ठरली. दिल्लीच्या नोएडा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका मुलीनेच आपल्या आईवर लोखंडी तव्याने सपासप वार करुन तिची हत्या केली. पोलिसांनी या घटनेनंतर १४ वर्षीय किशोरीला ताब्यात घेतले असून तिला नारी निकेतन येथे पाठवण्यात आले आहे. आईने मुलीला भांडी घासण्यावरुन ओरडल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलले. या घटनेनंतर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय झालं ?

१४वर्षीय किशोरी आणि तिच्या ३४ वर्षीय आई नोएडा सेक्टर ६६मधील सोसायटीमध्ये राहत होते. रात्री आईने मुलीला भांडी घासायला सांगितली. मात्र मुली भांडी घासण्यास तयार नव्हती. आई मुलीला फार ओरडली. मुलीला जबरदस्ती भांडी घासायला बसवून आई फोनवर गप्पा मारत होती. मुलीचा राग अनावर झाला होता. तिने घरातील लोखंडी तवा घेऊन आईवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. आधी मागून तिच्यावर हल्ला केला त्यानंतर चेहरा आणि डोक्यावर जोरदार वार केले.

आईच्या डोक्यात लोखंडी तव्याने वार केल्यानंतर बेडरुम पासून बाथरुममध्ये रक्ताचे पाट वाहत होते. घाबरलेल्या मुलीने रुमच्या लाईट्स बंद करुन खाली पळ काढला आणि खाली आल्यानंतर सर्वांसमोर आईला कोणीतरी मारल्याचे नाटक करत हंगामा केला. काही लोकांनी रुमवर जाऊन किशोरीच्या आईला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रविवारी रात्री सेक्टर ७७मधील सोसायटीमध्ये एका ३४ वर्षीय महिला मृतावस्थेत सापडली. पोलिसांना मुलीवर संशय आल्याने त्यांची चौकशी केली असता मुलीने आपण आईचा खून केल्याचे कबूल केले.

किशोरीचे वडील लहानपणीच गेल. त्यामुळे किशोरी आणि आई दोघीच राहत होत्या. किशोरीची आई ग्रेटर नोएडा कंपनीमध्ये काम करत होती. लहानपणापासून किशोरीला वडिलांचे प्रेम मिळाले नाही. किशोरीला आईचे वागणूक अनेक दिवसांपासून खटकत होते. रुमवर आईला भेटण्यासाठी सतत अनेक लोक येत असत. यामुळे सोसायटीतील लोकही किशोरीला टोमणे मारत असत. आई सतत ऑफिसच्या कामामुळे घराबाहेर असतं. किशोरीला या सगळ्याचा राग आला होता. त्यातून तिने हे पाऊल उचलल्याचे सांगतिले जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.