मुस्लिम समाजाच्या वतीने मिरजेत अतिउत्साहाने शिवजयंती साजरी
मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शेख म्हणाले की आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यांमध्ये कुणावरही अन्याय अत्याचार खपवून घेतले जात नव्हते पीडितांना न्याय देण्याचा काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते शिवाजी महाराज हे बहुजनांचे कैवारी होते त्यांच्या राजवटीमध्ये सुख समृद्धी आणि शांती होती त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सैनिक प्रमुख जबाबदार पदावर होते.
शेतकऱ्यासाठी अनेक योजना राबवल्या रयतेच्या रक्षणासाठी अनेक किल्ले बांधले आरमार दल उभा केले असे जैलाब शेख यांनी अभिवादन प्रसंगी म्हणाले यावेळी बहुसंख्य मुस्लिम युवक उपस्थित होते मिर्झा शेख,जमीर शेख,इम्रोज सय्यद,झायेद सय्यद,नासिर शेख,मोहसीन सय्यद,घुडूलाल चिंचणीकर,सुनील भोसले आदी उपस्थित होते साखर वाटून छत्रपती शिवाजी महाराज की जय ... जयघोष देऊन उत्साहात जयंती साजरी केली 19/2/2022
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.