सांगलीतील काळ्या खणीवर होणार फूड पार्क आणि बोटिंग: 15 दिवसात प्रत्यक्ष विकसनास सुरवात: मनपाच्या संकल्पनेतून दुर्लक्षित काळी खण होणार पर्यटन स्थळ
सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या काळ्या खणीच्या शुशोभीकरण करण्याचा संकल्प मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी हाती घेत काळी खण विकासावर अधिक भर दिला. काळ्या खणीचा विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन कापडणीस यांनी याचा एक विकासात्मक एक्शन प्लान तयार केला. यामध्ये काळ्या खणीच्या स्वच्छतेपासून ते बोटिंग पर्यंतचे सर्व नियोजन करण्यात आले. काळ्या खणीच्या विकासासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी खणीच्या कामाची सुरुवात केली. पहिल्यांदा खण स्वच्छ करून जलस्रोत मोकळे केले. त्यानंतर या खणीच्या मधोमध तरंगता कारंजा बसवून सांगलीकर जनतेचे लक्ष वेधले. आता या काळ्या खाणीच्या विकास गतीने केला जात आहे. यामध्ये या काळ्या खणीच्या पश्चिम बाजूला भव्य असे एखाद्या शॉपिंग मॉलप्रमाणे फूड पार्क साकारले जात आहे. याठिकाणी पर्यटनासाठी आणि बोटिंगसाठी येणाऱ्या
नागरिकांना आकर्षक असा फूड पार्क उपलब्ध केला जाणार आहे. या सर्व संकल्पनेचे काम गतीने सुरू करण्यात आले असून प्रत्यक्ष फुडपार्क आणि बोटिंग सुविधेचे काम 15 दिवसात सुरू होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सांगलीचे नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क म्हणून काळी खण नावारूपाला येणार आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून काळी खण सुशोभीकरण काम गतीने सुरू असून लवकरच काळ्या खणीत बोटिंग सुरू झाल्यानंतर काळी खण ही एक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक संपादन करणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.