Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मिरज प्रांताना व मिरज महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आल

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मिरज प्रांताना व मिरज महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आल


26 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू होणाऱ्या मिरासाहेब उरुसाच्या अनुषंगाने खेळणी दुकाने पाडणे  मनोरंजनाच्या बाबी चालू करण्यासाठी निवेदन सालाबाद प्रमाणे 26 फेब्रुवारी 2022 रोजी मिरज येथे होणाऱ्या 647 वा वा हजरत ख्वाजा शमणा मीरासाहेब यांच्या उरूस प्रारंभ होत आहे या मोठ्या उरुसानिमित्त गोवा,आंध्र प्रदेश, कर्नाटक,तेलंगणा,राजस्थान व मध्यप्रदेशातून तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात

सध्या सर्व काही सुरळीत चालू असून रेल्वे व बस त्यांच्या पूर्ण क्षमतेने प्रवासी घेत आहे सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालय व कारखाने उद्योग सर्व महाराष्ट्रातील आठवडी बाजार दैनंदिन बाजार सिनेमा ग्रह नाट्यग्रह हॉटेल सुरळीत चालू आहे गेली दोन वर्षे झालं हजरत मीरा साहेबसाला प्रशासनाकडून दुकाने पाळणे यासाठी काही निर्बंध लावले होते व ते आवश्यक ही होते.आज परिस्थिती बदललेली आहे सर्व देशाचे व राज्याचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आले आहेत या सर्व गोष्टीचा जिल्हा प्रशासनाने योग्य तो विचार करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुप्रसिद्ध व हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या उरुसामध्ये खेळणी दुकाने पाळणे अशा प्रकारच्या मनोरंजनाच्या बाबी करता प्रशासनाने योग्य ती सकारात्मक भूमिका घेऊन आम जनतेला दिलासा देऊन मिरज करांच्या आनंद द्विगणित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली शहर जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख यांनी केली आहे.ते म्हणाले की मिरज शहरातील उरूस प्राचीन काळापासून प्रचलित असलेले हिंदू-मुस्लीम सह सर्व धर्माचे श्रद्धास्थान म्हणजे हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा या पवित्र अशा दर्ग्याची कीर्ती अगदी देश-विदेशात पोचलेली आहे दरवर्षी भरणारा मिरजेचा उरुस हा एक प्रकारे सर्व धर्म समभावचे एकीचे दर्शन दाखवतो तसेच ऊरसाची शोभा वाढविण्यासाठी व जनतेच्या मनोरंजनासाठी जिल्हा प्रशासन,तालुका प्रशासनाने व मिरज महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन सहकार्य करावे.अशी मागणी यावेळी मिरज प्रांत साहेबां समक्ष भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मिरज महापालिकेचे उपायुक्त दत्तात्री लांगी यांना समक्ष भेटून मिरज शहरातील व उरूस मार्गातील सर्व दिवाबत्ती चालू करणे.मिरज दर्गा परिसरामध्ये उरूस काळासाठी अतिरिक्त वीस ते पंचवीस हॅलोजन लाईटची व्यवस्था करणे. उरूस मार्गावरील तसेच संपूर्ण शहरातील पथदिवे चालू आहे की बंद आहे याची पाहणी करणे.मोकाट जनावरे व भटकी कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे उरूस मार्गावरील  साफसफाई करणे मिरज शहराला उरूस काळामध्ये स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणीची व्यवस्था 24 तास करणे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करणे.महिलांसाठी व पुरुषांसाठी फिरते शौचालय उपलब्ध करणे रोजचा रोज कचरा उठाव करणे औषध फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख,शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे विजय बल्लारी,कमृद्दिन मोमिन,सलिम आतार,बबन साठे, गणेश कांबळे,साद गवंडी व अजय बाबर आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.