मंत्री नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणले, दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार व मनी लॉन्ड्रीग प्रकरणी मलिकांची चौकशी
मुंबई : आज सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिकांच्या घरी पोहचले होते. यावेळी त्यांनी मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात आणले आहे. मलिक यांना कोणत्या कारणासाठी आणले याची माहिती समोर येत नाहीय, पण जुन्या मालमत्ता प्रकरणी मलिकांची चौकशी होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मोस्ट वॉन्टेड कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार व मनी लॉन्ड्रीग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची सुत्रांची माहिती आहे.
राज्यात एकिकडे आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक करत राळ उडविली जात असून, घोटाळ्याचे राजकारण सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर महाआयटी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे, तर किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथे १९ बंगल्यांची खरेदी केली होती, तसेच हि खरेदी करताना अनिमियतता दाखवली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तर नारायण राणे, विनायक राऊत, मोहीत कंबोज, नितेश राणे, महापौर किशोरी पेडणेकर हे ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपावर केलेले घोट्याळ्यांच्या आरोपामुळं ईडीचा वापर करुन सुडाचे राजकरण भाजप करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे.
भाजपकडून सुडाचे राजकारण
दरम्यान, मलिक यांनी ईडीने ताब्यात घेतल्यानंतर ईडी तपास यंत्रणा ही संस्था केंद्रातील भाजपाच्या सांगण्यावरुन काम करत आहे, त्यामुळं भाजपा सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मितकरी यांनी केला आहे. तसेच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सुद्धा भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन आता दिवसभरात महाविकास आघाडी तसेच भाजपाकडून कोणकोणत्या प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.