भारतीय ब्ल्यू पँथर
कर्नाटक राज्यातील एका मनुवादी न्यायमूर्ती मल्लिकार्जून यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी न्यायालयाच्या प्रांगणात तिरंगा ध्वज फडकविण्याच्या अगोदर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पहिला हटवा मगच तिरंगा ध्वज फडकवला जाईल असा विशारी पवित्रा घेऊन, मनुवादी जातियवादी, जबाबदार असणारे न्यायाधीश याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटवला गेला,
त्याचवेळी न्यायालयातील सर्व वकिलांनी तीव्र निषेध करून अशा न्यायाधीशांला निलंबित करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करण्यात यावी यासाठी कर्नाटक राज्यातील सर्व दलित संघटना, सर्व बहुजन समाज व वकिलांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या न्यायमूर्ती मल्लिकार्जूनच्या विरोधात कर्नाटक राज्यातील दलित आंबेडकरी चळवळीतील आंदोलनाला "भारतीय ब्ल्यू पँथर "चा जाहीर पाठिंबा व मनुवादी न्यायमूर्ती मल्लिकार्जूनचा भारतीय ब्ल्यू पँथर तीव्र शब्दांत निषेध करते.
आयु. नितिन वसंत गोंधळे, सांगली
संस्थापक अध्यक्ष
भारतीय ब्ल्यू पँथर,.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.