श्री शिवछत्रपती हे सामान्य जनतेचे राजे......आमदार सुधीरदादा गाडगीळ
सांगली १९ फेब्रुवारी : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
“श्री शिवछत्रपती यांच्या सैन्यात, कारभाऱ्यात प्रामुख्याने बारा बलुतेदार समाजाचा सहभाग मोठा होता. जात-पात विसरुन महाराष्ट्र धर्मासाठी या समाजाला महाराजांनी जवळ केले. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील सैनिक तर महाराजांचे जीवाभावाचे सहकारी होते. जातीपेक्षा एखाद्या व्यक्तीचे कर्तुत्व पाहून महाराज त्याची निवड करत होते. त्यामुळे तत्कालीन समस्त मराठी माणसाला शिवछत्रपती हे आपले दैवत वाटत होते. त्याअर्थाने श्री.शिवछत्रपती हे सामान्य जनतेचे राजे होते. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे”. असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मांडले. आमदार संपर्क कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करताना ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, नगरसेवक संजय कुलकर्णी, प्राचार्य डी.जी. कणसे, उद्योग आघाडी सरचिटणीस रविंद्र बाबर, उद्योग आघाडी उपाध्यक्ष सचिन बालनाईक, सचिव अतुल माने, अल्पसंख्याक उपाध्यक्ष सुभाष पाटील, प्रणव गोडसे, आबा जाधव, श्रीधर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.