महापालिका क्षेत्रात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम : महापौरांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ
सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पार पडली. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत हनुमान नगर आरोग्य केंद्रावर लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर सुर्यवंशी यांच्याहस्ते बालकास लसीचे डोस पाजून मोहीम सुरू करण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेसाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने चोख नियोजन केले आहे.
या शुभारंभवेळी समाजकल्याण समिती सभापती सुबराव मद्रासी, उपायुक्त चंद्रकांत आडके, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेवक अभिजित भोसले, नगरसेविका नसीमा नाईक, आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ वैभव पाटील, डॉ शीतल धनवडे आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील एकूण 494 केंद्रावर पल्स पोलिओ लसीकरण पार पडले. याचबरोबर एसटी स्टॅण्ड , रेलवे स्टेशन, जकात नाके, टोल नाके याकरिता 73 ट्रान्झिट बुथच्या माध्यमातूनही लसीकरण करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.