Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा निश्चित करा भाजपा युवा मोर्चा धीरज सूर्यवंशी

 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा निश्चित करा भाजपा युवा मोर्चा धीरज सूर्यवंशी


सांगली मंगळवार  22 फेब्रुवारी 2022:- सांगली शहरांमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवणे कामे जागा निश्चित करण्यासाठी समिती गठित करून जागा निश्चित करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे आवश्यक आहे. याबाबत विविध संघटना सांगली शहरातील नागरिकांची मागणी पाहता विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे.तरी येत्या८ते१० दिवसांमध्ये विशेष महासभेचे आयोजन न केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे महापालिका आवारात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याबाबतचे निवेदन मा. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी, युवा मोर्चा अध्यक्ष पै.धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय यमगर,इमरान शेख,युवा मोर्चा सरचिटणीस प्रथमेश वैद्य,उपाध्यक्ष अमित गडदे,सचिव अनिकेत खिलारे,विद्यार्थी आघाडीचे सिद्धांत काटकर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.