रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, होतील 'हे' गंभीर परिणाम
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली. पुतीन यांच्या या मोठ्या निर्णयानंतर जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. रशिया-युक्रेन युद्ध भारतापासून लांब होत असलं तरी त्याचे अनेक गंभीर परिणाम भारतातही होणार आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती गेल्या महिन्याभरात आधीच 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिस्थिती चिघळली तर तेलाची किंमत प्रति बॅरलसाठी 125 डॉलरपर्यंत पोहचू शकते. शिवाय देशभर आधीच वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धात रशियावर निर्बंध लादण्याची तयारी दाखवत युक्रेनला पाठिंबा दिला. त्यामुळे रशिया चीनवर अधिक अवलंबून राहणार. रशिया-चीनच्या वाढत्या मैत्रीचा भारताला धोका आहे. कारण भारत-चीन सीमेवर अजूनही 1 लाख सैनिक तैनात आहेत.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका शेअर बाजाराला बसणार आहे. गव्हाची निर्यात करणारा रशिया पहिला तर युक्रेन चौथा मोठा देश आहे. युद्ध झालेच तर जगात आणि भारतात गव्हाचे भाव वाढू शकतात. शिवाय, पॅलेडियम धातू निर्यात करणारा रशिया सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे पॅलेडियम धातूची किंमत वाढली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.