मिरज तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी २२-२३ च्या बजेटमध्ये निधीची तरतूद करा पृथ्वीराज पाटील यांचे ना. अशोक चव्हाण यांना निवेदन
सांगली, दि.२३ : मिरज तालुक्यातल्या रस्त्यांच्या कामासाठी सन २०२२ - २०२३ च्या बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांना भेटून केली. ना. चव्हाण यांनी हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, या रस्त्यामध्ये पदमाळे, सांगली, हरिपूर, अंकली, इनाम धामणी, विश्रामबाग, माधवनगर, बिसूर, कर्नाळ तसेच मिरज पूर्व भागातील मिरज्, बेडग, आरग, लिंगणूर, बेळंकी या रस्त्याचाही समावेश आहे. श्री. पाटील यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी त्याची सुधारणा तातडीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी आपण ना. चव्हाण यांना भेटून केली आहे.
ते म्हणाले, या रस्त्यांमध्ये इनाम धामणी ते स्फूर्ती चौक, बुधगाव ते माधवनगर रस्ता, माधवनगर जकात नाका ते म्हसोबा जंक्शन तसेच करणार मार्गावरील जंक्शनचा भाग याचा समावेश आहे. रस्त्यांची सुधारणा, डांबरीकरण तसेच पुलांची दुरुस्ती या कामांचा त्यामध्ये समावेश आहे.
नाबार्डमधील कामे
श्री. पाटील म्हणाले, मिरज पूर्व भागातील रस्त्यांचे नाबार्ड २८ अंतर्गत रुंदीकरण, हॉटमिक्स व इतर दुरुस्ती करण्यास मंजुरी द्यावी, यासाठीही निवेदन दिले. त्यामध्ये मिरज, बेडग, आरग, लिंगणूर, बेळंकी या रस्त्यावरील किलोमीटर ० ते ३१ पर्यंतच्या रस्त्याचे काम करावे असे निवेदन मंत्रिमहोदयांनी दिले आहे. तसेच अंकली गावातील हायस्कूल ते जुनी धामणी पर्यंतच्या अडीच किलोमीटर रस्त्याचे हॉटमिक्स करण्यासाठीही निधी मागितला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.