Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेकडून 4150 नळ कनेक्शनचा सर्व्हे पूर्ण : सर्व्हेत 7 कनेक्शन अनधिकृत सापडले: आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहिम सुरूच राहणार : अधीक्षक उज्वला शिंदे यांची माहिती

 महापालिकेकडून 4150 नळ कनेक्शनचा सर्व्हे पूर्ण : सर्व्हेत 7 कनेक्शन अनधिकृत सापडले: आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहिम सुरूच राहणार : अधीक्षक उज्वला शिंदे यांची माहिती



नळ कनेक्शन अधिकृत करण्याबाबत कोणी पैशाची मागणी केल्यास तात्काळ महापालिकेशी संपर्क साधा : पाणीपुरवठा अधिकारी परमेश्वर अलकुडे यांचे आवाहन


सांगली:  सांगली महापालिकेकडून दोन दिवसात 4150 नळ कनेक्शनचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. या  सर्व्हेत पाणीपुरवठा विभागाला खणभाग आणि औद्योगिक वसाहत परिसरात 7 नळ कनेक्शन अनाधिकृत सापडली आहेत. 24 फेब्रुवारीपर्यंत मनपा आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली नळ कनेक्शन शोधमोहिम सुरूच राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अधीक्षक उज्वला शिंदे यांनी दिली. 

    सांगलीच्या शिंदे मळा,  कलानगर परिसरात 15 नळ कनेक्शन अनधिकृत सापडल्यानंतर याची गंभीर दखल घेत आयुक्त कापडणीस यांनी सांगली आणि कुपवाड परिसरातील नळ कनेक्शनचा सर्व्हे सुरू करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते. यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा अधिकारी परमेश्वर अलकुडे, अधीक्षक उज्वला शिंदे आणि विशेष अभियंता सुनील पाटील यांनी नियोजन करीत प्रथमतः 15 अनधिकृत कनेक्शनचा पंचनामा करीत कनेक्शन बंद केली. याच बरोबर बुधवार पासून सांगली आणि कुपवाड परिसरातील 60600 नळ कनेक्शन तपासणी सुरू करीत अनधिकृत नळ कनेक्शन शोधमोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात पाणीपुरवठा विभागाने 31 कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकूण 4150 इतक्या नळ कनेक्शनचा सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये एकूण 7 नळ कनेक्शन ही अनधिकृत आढळून आली आहेत. यामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये 1 आणि खणभागात 6 नळ कनेक्शन अनधिकृत सापडली आहेत. या 7 नळ  कनेक्शन धारकाकडे नळ कनेक्शन बाबत कसलीही कागदपत्रे आढळून आली नाहीत तर 3 कनेक्शन हे विना मीटर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाने रीतसर पंचनामा केला आहे. तसेच अनधिकृत नळ कनेक्शन शोधमोहीम 24 तारखेपर्यंत अधिक गतीने सुरू ठेवण्यात येणार असल्याची

माहिती पाणीपुरवठा अधीक्षक उज्वला शिंदे यांनी सांगितले. तसेच आपल्या कनेक्शनबाबतच्या तक्रारी बाबत 9 अर्जही प्राप्त झाल्याचे उज्वला शिंदे यांनी सांगितले. ज्या नळ कनेक्शन धारकांना आपल्या कनेक्शनबाबत काही शंका असेल किंवा बिलाबाबत तक्रार असेल त्यांनी पाणीपुरवठा विभागात आपले अर्ज 23 फेब्रुवारी पर्यंत दाखल करावेत असे आवाहनही उज्वला शिंदे यांनी केले आहे.

पैशाची मागणी केल्यास तात्काळ माहिती द्या: परमेश्वर अलकुडे यांचे आवाहन

सध्या आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन सापडत आहेत. नागरिकांनी आपले नळ कनेक्शन अधिकृत करण्याबाबत तसेच बिल कमी करून देऊ किंवा अन्य कोणत्याही प्रशासकीय कामासाठी कोणी पैशाची मागणी केल्यास तात्काळ महापालिकेशी संपर्क साधावा आणि त्या व्यक्तीची माहिती द्यावी, तसेच नागरिकांनी आपले पाणी बिल हे समक्ष पाणीपुरवठा कार्यालय येथे किंवा ऑनलाईन पद्धतीने भरावे आणि रीतसर पावती घ्यावी असे आवाहन प्रभारी पाणीपुरवठा अधिकारी परमेश्वर अलकुडे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.