Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वातंत्र्यानंतर आज पर्यंत गेली 40 वर्षे मागणी करूनही खंडेराजुरी

स्वातंत्र्यानंतर आज पर्यंत गेली 40 वर्षे मागणी करूनही खंडेराजुरी 


स्वातंत्र्यानंतर आज पर्यंत गेली 40 वर्षे मागणी करूनही खंडेराजुरी- गांधीनगर हा रस्ता झाला नाही. तिन किमीच्या रस्त्यासाठी गांधीनगर येथील नागरिकांनी सरपंचासह सामाजिक कार्यकर्ते   नागरिकांसह बुधवार दिनांक 23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

      खंडेराजुरी तील एक भाग म्हणजे गांधीनगर लोकसंख्या 700 ते 800, गावापासून अडीच ते तीन किलोमीटर लांब असणाऱ्या गांधीनगर मध्ये पहिली ते चौथी शाळा ,2 दूध डेअरी, मंदिरे ,शेकडो एकर द्राक्षबागा, ऊस शेती आहे. गावापासून शेती लांब आहे म्हणून खंडेराजुरी गावातीलच नागरिकांनी गांधीनगर परिसरात गेले पन्नास वर्षापूर्वी घरे बांधून आपले शेतीवर कौटुंबिक उदरनिर्वाह सुरू केली.


    कालांतराने वस्ती वाढली जाण्याचा रस्ता नाही म्हणून तेथील नागरिकांनी गेले चाळीस वर्षापासून सत्ताधाऱ्यांचे रस्त्यासाठी उंबरे झिजवले . पण सातशे ते आठशे लोकवस्ती असणाऱ्या त्या नागरिकांची कोणालाही दया आली नाही . या परिसरात शाळा, मंदिरे, दूध डेरी, मोठी द्राक्ष शेती असून सुद्धा चाळीस वर्ष रस्ता मिळत नाही ही या लोकशाहीत दुर्दैवी गोष्टी आहे.


    आज पर्यंत येतील  नागरिकांनी भरपूर अन्याय सहन केला निवडणुकीपुरते राजकारणी आश्वासन देतात पंतप्रधान सडक योजनेतून रस्ता मंजूर झाला म्हणून ग्रामपंचायतीला पाच वर्षांपूर्वीच पत्र आले पण ते रस्त्याचे काम मात्र काही झाले नाही. निवडणुकीत आश्वासने मिळतात रस्ता काही होत नाही त्यामुळेच येथील नागरिकांनी बुधवार दिनांक 23 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

    सामाजिक कार्यकर्ते विनोद मोरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात िल्हाधिकार्‍यांनी तात्काळ रस्त्याची पाहणी करून संबंधित विभागाला रस्ता करण्यासाठी आदेश द्यावेत असे निवेदन सरपंच ग्रामपंचायत खंडेराजुरी, रंगराव पवार ,प्रकाश चौगुले, चारुदत्त चौगुले ,अशोक चव्हाण विनोद मोरे ,व गांधीनगर नागरिक यांच्या वतीने पोलीस प्रशासन, पंचायत समिती ,बांधकाम विभाग व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.