शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ - सहायक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली दि. 22 : सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर भरण्याकामी दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत होती. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अद्याप अर्ज भरणे प्रलंबित असल्याने शासनाने महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती / फ्रीशिप / RSMS/ निर्वाह भत्ता योजनांचे अर्ज भरण्याकरीता दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
आजअखेर महाविद्यालयांनी या विषयी लक्ष न घातल्याने या जिल्ह्याअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहत आहेत. तरी वरील अंतिम दिनांकापर्यंत सर्व योजनांचे अर्ज भरुन घेण्यात यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास विद्यालय/ महाविद्यालय यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.