Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पहिल्या दिवशी प्रवाशांविना धावली टॅक्सी; कंपनीला 25 हजार रुपयांचे नुकसान

 पहिल्या दिवशी प्रवाशांविना धावली टॅक्सी; कंपनीला 25 हजार रुपयांचे नुकसान


मुंबई : नुकतेच मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या बहुचर्चित वॉटर टॅक्सीचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले आहे. मात्र, पहिलाच दिवशी वॉटर टॅक्सीची दोन्ही फेरी प्रवाशाविना धावली आहेत. त्यामुळे वॉटर टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीला 25 हजार रुपयांचा फटका बसला आहे.

२५ हजार रुपयांचा वॉटर टॅक्सीला चुना -

वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी समुद्र आणि नदीकाठच्या शहरांमध्ये जलवाहतूक विकसित करण्यावर केंद्रीय जल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी भर देत आहेत. कोरोना पूर्वी रोरो बोट सुरू झाली आहेत. आता नुकतेच मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीची ही सुरुवात झाली आहेत. मात्र, महागडे तिकीट असल्याने मुंबईकरांनी या बहुचर्चित वॉटर टॅक्सीकडे पाठ फिरवली आहेत. सोमवारपासून ५६ आसनी वॉटर टॅक्सीचा दोन फेऱ्या चालवण्याचा निर्णय 'गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड' कंपनीने घेतला आहे. त्यानुसार नवी मुंबईच्या बेलापूर बंदरावरून सोमवारी सकाळी भाऊच्या धक्क्याच्या दिशेने निघालेल्या वॉटर टॅक्सीची पहिलीच फेरी प्रवाशांविना सुरु झाली. याउलट भाऊच्या धक्क्याहून बेलापूर बंदराकडे सायंकाळी परतीच्या प्रवासातही वॉटर टॅक्सीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. परिणामी, पहिल्याच दिवशी प्रवाशांविना दोन फेऱ्या पूर्ण केल्याने वॉटर टॅक्सी चालक कंपनीस फक्त डिझेल खर्चापोटी तब्बल २५ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

५६ आसनी वॉटर टॅक्सीसाठी अवघे २९० रुपये तिकीट -

मुंबई व नवी मुंबई दरम्यान धावणाऱ्या वॉटर टॅक्सी सेवेत १२ आसनी आणि ५६ आसनी अशा विविध प्रकारच्या वॉटर टॅक्सी आहेत. त्यात सर्वात कमी तिकीट दर हे ५६ आसनी वॉटर टॅक्सीचे आहेत. बेलापूर ते भाऊचा धक्का हा प्रवास ५० मिनिटांत पार करणाऱ्या ५६ आसनी वॉटर टॅक्सीसाठी अवघे २९० रुपये तिकीट दर ठरवण्यात आले आहेत. या तिकीट दरात २६० रुपये वॉटर टॅक्सी चालकांना मिळणार असून ३० रुपये शासनास लेव्ही म्हणून मिळणार आहेत. वाहतुकदारांनी प्रवाशांचा प्रतिसाद पाहण्यासाठी सोमवारी या सेवेच्या मोजक्याच दोन फेऱ्या चालवल्या. मात्र दोन्ही फेऱ्या प्रवाशाविना चालवाव्या लागल्या आहेत.

वॉटर टॅक्सी चालक काय म्हणाले...?

मुंबई ते नवी मुंबई दरम्यान ५६ आसनी क्षमतेची वॉटर टॅक्सी चालवण्यात येत आहे. बेलापूर आणि भाऊचा धक्का या दोन ठिकाणांहून निघालेल्या पहिल्या फेरीत वॉटर टॅक्सीला एकही प्रवासी मिळालेला नाही. तरीही पुढील दोन ते तीन दिवस सेवा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु ठेवली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. दरम्यान, पहिल्या दिवशी वॉटर टॅक्सीला २५ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र प्रवाशांना या सेवेविषयी माहिती मिळाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड' कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक इक्बाल मुकादम यांनी व्यक्त केला आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.