सांगली जिल्ह्यात 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत
सांगली दि. 22 : सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 12 मार्च 2022 रोजी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली ए.एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाईची, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ खालील प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांत बॅंक, दूरसंचार, बीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकील पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती काळजी घेवून उपस्थित रहावे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविणेबाबतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.