Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत महापालिकेची माझी कृष्णामाई स्वच्छता मोहीम : कृष्णा जलप्रदूषणमुक्तीसाठी आले हजारो सांगलीकर: 100 टन कचरा झाला गोळा

सांगलीत महापालिकेची माझी कृष्णामाई स्वच्छता मोहीम : कृष्णा जलप्रदूषणमुक्तीसाठी आले हजारो सांगलीकर: 100 टन कचरा झाला गोळा



अँकर: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमेत सांगलीकर जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. माझी वसुंधरा अंतर्गत आणि कृष्णा नदी जलप्रदूषणमुक्त करण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम घेणेत आली. यावेळी कृष्णा नदीच्या आणी परिसराच्या स्वच्छतेसाठी खुद्द महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनीही सहभागी होत श्रमदान केले. सुमारे चार तासाच्या या मोहिमेत 100 टन कचरा संकलित झाला आहे.

    सांगलीच्या कृष्णा नदीच्या परिसरात झालेली अस्वच्छता आणि त्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी माझी वसुंधरा अंतर्गत माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमेची घोषणा केली होती. यामध्ये महापालिका अधिकारी, पदाधिकारी कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था, संघटना, एनजीओ तसेच शाळा महाविद्यालय यांना सहभागी होणेचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, शाळांचे विद्यार्थी पुढे आले आहेत. या सर्वानी मिळून वसंतदादा समाधी घाट , स्वामी समर्थ घाट, सरकारी घाट, विष्णू, अमरधाम स्मशानभूमी यासह सांगली वाडीच्या दोन घाटाची स्वच्छता केली. यामध्ये 100 टन कचरा संकलित झाला असून 200 टन माती मोहिमेत गोळा झाली आहे. संकलित कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, झाडी झुडपे आदींचा समावेश आहे.


 या मोहिमेत उपमहापौर उमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सभापती निरंजन आवटी, समाजकल्याण सभापती सुबाराव मद्रासी, नगरसेवक अभिजित भोसले, जगन्नाथ ठोकळे, तौफिक शिकलगार, नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर याच्यासह सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी , उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापतीं निरंजन आवटी, ब्रँड अंबेसिडर डॉ दिलीप पटवर्धन, अजितकुमार कोष्टी यांनीही सहभागी होत श्रमदान केले. मोहिमेचे संयोजन सहायक आयुक्त नितीन शिंदे, सावता खरात यांच्यासह वरीष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी केले. 

आस्था बेघरकडून पथनाट्य सादर

या स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणी मिरजेतील आस्था बेघर निवारा केंद्राकडून स्वच्छतेबाबत पथनाट्य सादर करत जनजागृती करण्यात आली. यामध्ये सुरेखा शेख आणि शाहीन शेख यांच्यासह आस्था बेघर केंद्राचे कलाकार सहभागी झाले होते.


बोटीच्या साहाय्याने अग्निशमन विभागाने केली नदीपात्राची स्वच्छता

माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन विभागाचे केलेल्या सशक्तीकरणाचा चांगला उपयोग झाला. मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमने आपल्या अत्याधुनिक बोटी आणि साहित्यासह नदी पात्रातील जलपर्णी आणि गवत काढत मोहिमेत सहभाग घेतला. 

कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी एकवटले हजारो सांगलीकर

आजच्या कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेला  सेवाभावी संस्था १४ , मनपा शाळा ४५, खाजगी शाळा २२ बचतगट १६, कृष्णा बोट क्लब. यांच्या एकूण ४५९ व्यक्तींनी सहभाग घेतला.  

कार्यालयीन कर्मचारी २८१, स्व.नि, मुकादम, सफाई कर्मचारी १२००, अग्निशमन विभाग ४५ करमचारी असे एकूण साधारण २००० व्यक्तींनी सहभाग घेतला. यासह २० रिक्षा घंटागाडी,१० ट्रक, २ जेसिबि, २ बोटच्या सहाय्याने २०० टन गाळ माती, १०० टन कचरा संकलन केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.