महाराष्ट्र राज्यात गुंठेवारी खरेदी विक्री सुरू आहे गुंठेवारी प्लॉट धारकांचे खरेदी विक्री बंद आहे अशी अफवा पसरवली जात आहे या सदरा खाली गुंठेवारी धारकांची लूट होत आहे हे चालणार नाही - चंदनदादा चव्हाण शिवसेना गुंठेवारी विकास समिती चे राज्य प्रमुख.
नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी जुलै महिन्यात शासन आदेश काढला आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की गुंठेवारी प्लॉट खरेदी करताना आपल्या जागेचा नकाशा संबंधित महापालिका , नगरपालिका नगर रचना विभागाकडील असायला पाहिजे , प्रमाणपत्र जोडल्यास या राज्यातले दुय्यम निबंधक असे दस्त ऐवज नाकारू शकत नाहीत शिवाय कोणी असे दस्त ऐवज होत नाहीत म्हटल्यावर शिवसेना गुंठेवारी विकास समितीकडे संबंधित दुय्यम निबंधक बाबत माहीती द्यावी त्यांच्या बाबत समिती राज्याचे मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी करून त्यांना शासन आदेश मानत नसल्या बाबत निलंबित करावे अशी भूमिका समितीची राहणार आहे
शहरी भागातील डेव्हलपर यांनी आता मनाला वाट्टेल तसे खाजगी नकाशे तयार करून प्लॉट विक्री करण्यावर शासनाने पूर्णपणे बंदी आणली आहे त्यांनी संबंधित पालिकेच्या नगर रचना विभागाकडून आपापले ले आउट मंजूर करून घ्यावेत म्हणजे त्यांना कोणतीही अडचण राहणार नाही लोक टायटल क्लिअर आहे म्हटल्यावर लोक जादा पैसे द्यायला तयार आहेत हे समजून घेतले पाहिजे ज्या शहारा मध्ये अंतिम विकास आराखडे मंजूर असलेल्या शहरात ही प्रक्रिया सुरू आहे जेणे करून गुंठेवारी प्लॉट धारकांची फसवणून होऊ नये यासाठी हा निर्णय झाला आहे
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या जुलै महिन्यात शासन आदेश आला त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बागायत 20 गुंठे व जिराईत दोन एकर पुढे खरेदी दस्त ऐवज करण्याची मुभा आहे मात्र अल्प भु धारकांचे दस्त ऐवज करण्या साठी तसेच बागायत , जिराईत कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सक्षम अधिकारी यांच्या परवानगीची अट घातली आहे त्यामध्ये गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांना शिवसेना गुंठेवारी समितीने या मध्ये दुरुस्ती साठी उपाय सुचवले आहेत त्यांची लवकरच अंमल बजावणी होणार आहे
ग्रामीण भागातील गावठाण हद्दी पासून 200 ते 750 मी परिघिय क्षेत्रात गुंठेवारी प्लॉट धारकांनी आपापल्या जागेचे नकाशे हे जिल्हा नगर रचनां विभागाकडून जागेचे नकाशे मोजणी करून घेतल्यास त्यांचे ही दस्त ऐवज होतात हे लक्षात घेतले पाहिजे म्हणजे त्यांना भविष्यात कोणतीही अडचण राहणार नाही
महापालिका , नगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र तुकडेजोड तुकडे बंदी कायदा 1974 चा लागू नाही विनाकारण एखादी बाब न समजून घेता गुंठेवारी दस्तऐवज बंद झाले असल्या बाबत कोणी अफवा पसरवू नयेत.उलट ज्यांना या बाबत माहिती नाही त्यांना दुय्यम निबंधक माहिती देत आहेत त्यांची नागरिकांनी भेट घ्यावी असे आव्हाहन केले आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.