Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेकडून आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत “फिट इंडिया फ्रिडम रन २.०” उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे : उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन

महापालिकेकडून आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत “फिट इंडिया फ्रिडम रन २.०”  उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे : उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन


दि. १३ ऑगस्ट २०२१ ते ०२ ऑक्टोंबर २०२१ यादरम्यान नागरिकांनी जेथे शक्य आहे तेथे धावणे, चालणे व सायकलींग इत्यादी व्यायाम करत उपक्रमात सहभागी व्हा सांगली: केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत सन २०२० मध्ये दि. १५ ऑगस्ट २०२० ते दि. ०२ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत “फिट इंडिया फ्रिडम रन” हा उपक्रम संपूर्ण देशभर

आयोजित करण्यात आलेला होता. त्याच धर्तीवर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत “फिट इंडिया फ्रिडम रन २.०” हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट २०२१ ते दि.०२ ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत संपन्न होत आहे. अशी माहिती मनपा  उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली. 

सदर ५१ दिवसाच्या या कालावधीत महानगरपालिका स्तरावरील विदयार्थी, शिक्षक, पालक व नागरिक या उपक्रमात स्वताहून सहभागी होऊ शकतात. त्याकरीता महानगरपालिका क्षेत्रातील शाळा,

महाविद्यालय, शासकीय क्रीडांगण, उद्याने, क्रीडा मंडळे व क्रीडा विषयक कार्य करणा-या विविध संस्था या ठिकाणी तसेच नागरीकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जेथे शक्य आहे तेथे धावणे, चालणे व सायकलींग इत्यादी प्रकारे उपक्रमात स्वताहून सहभागी होऊन आपण केलेल्या उपक्रमाबाबतचे फोटो, व्हिडीओ, पोस्टर्स इत्यादी बाबीं https://fitindia.gov.in या पोर्टलवर अपलोड कराव्यात. सदर उपक्रम राबविताना सर्व स्तरावर कोविड बाबतच्या सर्व नियमांचे (S.O.P.) पालन करावे. तसेच भारत सरकारच्या आझादी का अमृतमहोत्सव व रन फॉर इंडिया या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सदर उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे

आवाहनही सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यावतीने उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगली यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.