आयुष सेवाभावी संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्बुलन्स चे लोकार्पण सोहळा गुजराती शाळा सांगली येथे पार पडले
आमदार दिवाकर रावते यांच्या स्थानिक विकास निधीतून आयूष सेवाभावी संस्था व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला मिळालेल्या रुग्णवाहिकेला अत्याधुनिक रुग्णवाहिका करण्यासाठी गुजराती सेवा समाज व दानशूर देणगीदारांच्या मदतीने सर्व सोयींनीयुक्त अद्यावत कार्डीयाक रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे ना नफा ना तोटा या तत्त्वावर आयुष संस्थेकडून ही अत्याधुनिक रुग्णवाहिका चालविण्यात येणार आहे याचा नक्कीच जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले
प्रारंभी मान्यवरांचे गुजराती सेवा समाजाचे खजिनदार रितेशभाई शेठ यांनी स्वागत केले प्रास्ताविक शरद शहा यांनी केले आयुष संस्थेचे माहिती संस्थेचे रमेश पाटील यांनी दिले यावेळी मान्यवरांनी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर दिलीप पटवर्धन, प्रकाश शाह, प्रवीणजी लुकंड, हर्षदभाई शहा, दिपकभाई शाह, विवेक शाह, आभाळमाया फाउंडेशन, परेश मक्कीम, राजू शहा, जतीनभाई शाहा, निगमभाई शाह, अभय जैन, निनाद शहा, गुजराती सेवा समाज आदींचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळ्याचे संयोजन गुजराती सेवा समाजाचे अध्यक्ष कांतीभाई वामजा, उपाध्यक्ष शरद शहा, सचिव दीपकभाई शहा, खजीनदार रितेश शेठ, डॉक्टर महेश शहा, दिपेनभाई देसाई, ललित संग्राम, शैलेश धधुकिया, मुकेश पटेल, आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, संचालक महावीर पाटील, अविनाश पवार इमतियाज बोरगावकर, अमोल व्हटकर, सुरज शेख अजित पाटील, अजीत कांबळ, अनिल पाटील बाळासाहेब पाटील व गुजराती हायस्कूल चे सर्व पदाधिकारी व शिक्षक कर्मचारी यांनी केले श्रीमती सुवर्णा जोशी यांनी सूत्रसंचालन केले शिवसेना विधान सभा क्षेत्र प्रमुख तानाजी जाधव मिरज शहर प्रमुख विजय शिंदे कुपवाड शहर संघटक सुरज कासलीकर महिला जिल्हा संघटक सुजाता इंगळे आधी उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.