महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम यशस्वी करा: आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांचे आवाहन ;महापालिकेत आशा वर्कर आणि स्टाफ नर्सची बैठक संपन्न
सांगली : शासनाच्या आदेशानुसार राज्यासह सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम यशस्वी करा असे आवाहन आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांनी केले आहे. या मोहिमेतर्गत टीबी आणि लेप्रसी यांच्या संयुक्त विद्यमानाने सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम व नियमित सनियंत्रण नियमित मोहिम राबविण्यात येत आहे.
भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत देश करण्याचे लक्ष्य देण्यात आलेले आहे. देशभर, राज्यभर हे अभियान सुरू राहणार आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातसुद्धा ही मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी महापालिकेत आशा वर्कर आणि स्टाफ नर्स यांची बैठक पार पडली.
मनपा आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी टीबी एचआयव्ही विभागाचे वरिष्ठ सुपरवायझर नितीन देसाई, समन्वयक अधिकारी स्वप्ना देशपांडे, आशा समन्वयक अधिकारी ऋतुजा पाटील, सुपरवायझर मुस्तफा शेख, अनिल चव्हाण, लॅब सुपरवायझर सुनीता शिंदे,
लेखापाल अनिल वाघमारे, स्नेहल पाटील , फार्मसी अधिकारी कपिल भाकरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, ज्यांना दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला कोणास असेल तर त्यांनी आमच्या आशा वर्करशी संपर्क साधून माहिती द्यावी आणि वेळेत निदान करून घ्यावे असे आवाहन डॉ रवींद्र ताटे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.