कोविड-१९ मुळे ज्या १८ वर्षाखालील बालकांच्या मयत पालकांची माहिती कळवावी : महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन
सांगली: कोविड-१९ मुळे ज्या १८ वर्षाखालील बालकांचे एक किंवा दोन पालक मयत झाले आहेत अशा पालकांची माहिती महापालिकेला कळवा असे आवाहन महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विकास विभाग शासन निर्णय क्र.- अनाथ-२०२१/प्र.क्र.४९/का- ०३ च्या शासन निर्णयानुसार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोविड-१९ मुळे ज्या १८ वर्षाखालील बालकांचे एक किंवा दोन पालक मयत झाले आहेत अशा बालकांची माहिती महापालिकेकडील श्रीमती मनिषा शरद मोहिते संपर्क क्रमांक ९८२३८१०१५०, आर.सी.एच. कार्यालय कोविड वॉर रुम कक्ष आपटा पोलिस चौकी समोर पाण्याची टाकीखाली सांगली येथे खालील नमुन्यात देण्यात यावी असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. सदर महितीच्या आधारे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला बालविकास आधिकारी जिल्हा संरक्षण कक्ष सांगली यांच्यामार्फत महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा लाभ सदर बालकांना दिला जाणार आहे, त्यामुळे याची माहिती कळवावी असे आवाहनही उपायुक्त रोकडे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.